"गुरु पौर्णिमा"- लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, July 23, 2021, 10:52:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "गुरु पौर्णिमा"
                             लेख क्रमांक-2
                            --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. महर्षी व्यासांच्या काळापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. व्यासांनीच सर्वांना वेदाचे ज्ञान, धडे शिकवले. हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला एक विशेष महत्व आहे. या दिवशी गुरूंची पूजा करुन त्यांना वंदन केलं जातं. तसेच गुरूंचा आशिर्वाद घेतला जातो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला गुरूंना प्रत्यक्ष भेटता येत नाही. त्यामुळे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना मेसेजेसद्वारे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत असल्याचं पहायला मिळत आहे.

     गुरुपौर्णिमा ही हिंदू महिन्यात आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. दरवर्षी गुरुपौर्णिमा साधारणत: जुन महिन्यात किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला येते. मात्र, यावर्षी गुरुपौर्णिमा 23 जुलै रोजी आली आहे. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल होणारे काही मेसेजेस...

     "गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
    -------------------------------

1) गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु,
    गुरुदेवो महेश्वर
    गुरु साक्षात परब्रह्म,
    तस्मै श्री गुरवे नमः

2) आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर
    काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पाडलेल्या
    सर्व गुरूंना धन्यवाद.

3) ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड
    ज्याला आहे अगाध ज्ञान
    जो देई हे निस्वार्थ दान
    गुरु त्यासी मानावा
    देव तेथेची जाणावा.

4) गुरु म्हणजे आहे काशी
    साती तीर्थ तया पाशी
    तुका म्हणा ऐंसे गुरु
    चरण त्याचे हृदयी धरू.

5) जे जे आपणासी ठावे,
    ते दुसऱ्यासी देई,
    शहाणे करून सोडी सकळ जना
    तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..

    अनेकदा कोण्या अन्य व्यक्तीच्या आधीच आपणही स्वत: आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो, त्यामुळे तुमच्यातील गुरूला सुद्धा आवर्जून वंदन करा. तुम्हा सर्वाना येत्या गुरु पौर्णिमा सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

    ( सौजन्य आणि साभार - सोशल मीडियावरील गुरु-पौर्णिमेवरील मेसेजेस )
    -------------------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.07.2021-शुक्रवार.