रेल्वेचा विनातिकीट प्रवास-चारोळया-"विनातिकीट मी प्रवास करतो,रेल्वेचा कायमचा जावई

Started by Atul Kaviraje, July 30, 2021, 02:03:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

          रेल्वेचा विनातिकीट प्रवास-खुसखुशीत चारोळया
"विनातिकीट मी प्रवास करतो,रेल्वेचा कायमचा जावई होतो !"-भाग-१
-----------------------------------------------------------


(१)
तिकिटाचे दर वाढताहेत दिवसेंदिवस
प्रवास रेल्वेचा फार खर्चिक होत चाललाय
मासिक पासही  परवडेनासा झालाय आतासा,
मार्ग चोखाळलाय  मी चक्क विनातिकिटीचा.

(२)
तिकिटासाठी रांग लावण्याची कोण घेईल मेहनत
ऑफिसला जाण्याची वेळ चाललीय चुकत
रेलवे गाड्याही वेळेनुसारच धावत असतात,
विनातिकीट प्रवासाच्या या सवयी, अंगवळणी पडत जातात.

(३)
टी सी असो वा टी टी असो,रेल्वे स्थानकात कुठल्याही
जरा जास्तच दाखवितो मग मी सभ्य पणाही
माझ्या भोळ्या व्यक्तिमत्त्वाला ते सहजी फसतात,
माझा बाहेर जायचा मार्ग ते मोकळा करतात. 

(४)
कधी-  कधी माझा कयास सपशेल चुकतो
एखाद्या हुशार - चाणाक्ष तिकीट चेकरच्या मी हाती सापडतो
पावती न फाडता,दोन दिवसांची हवा खाऊन येतो,
रेल्वे जेलचा मी कधी-कधीच आवडता जावई असतो.

(५)
विनातिकीट प्रवासात नेहमीच घ्यावी लागते दक्षता
पकडला गेलो तर, कुणी नाही टाकीत डोक्यावर अक्षता
बसलो असलो तरी सारे लक्ष असते गाडीच्या दाराकडे,
अन टी सी बरोबर येणाऱ्या, दोन पोलिसांच्या दंडुक्याकडे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.07.2021-शुक्रवार.