चारोळी -लेख - "साद पावसाला"

Started by Atul Kaviraje, July 31, 2021, 10:57:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                चारोळी -लेख 
                               "साद पावसाला"
                               --------------


================
माझी साद ऐकून तो
येतो झणी रे धावून
फक्त माझंच ऐकतो, तो येतो,
नात हे जन्मो-जन्मीचे घेऊन.
================


     पुन्हा  आज पावसावर एक चारोळी, आज पाउस खूप छान पडला, भरपूर पडला, थांबतच नव्हता. 

    जेव्हापासून माझा तो मित्र झाला तेव्हापासून त्याचे माझे इतके अतूट सख्य जमले, कि तो आला  नाही तर मला चैन पडेनासे होते, माझा जीव , प्राण कासावीस होतो, एकवार दर्शन, दिवसातून एकदा तरी त्याला पाहावे असे मला अंतरातून वाटते.  आणि तो आला कि मला लॉटरी लागल्याचा फील होतो. हर्ष-वायू होतो, मी हर्षाने आनंदाने एखाद्या मयुरासम नाचू लागतो, नर्तन करतो, फेर धरतो, पिंगा घालतो.

     असाच एकदा म्हणजे अगदी मागील महिन्याचीच बात आहे, गेल्या मासात तो इतका रुसून बसला कि सर्व मानव-जात त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पहात राहिली. आता येईल उद्या येईल पण ढिम्म तो काही आलाच नाही, सर्वांच्या  अंगातून घर्म धारा व नयनांतून अश्रू धारा वाहू लागल्या, साऱ्यांचा जीव पाण्याविना कासावीस झाला, शेवटी अगदीच पर्याय नसल्यासारखे सारेजण माझ्याकडे आले, त्या सर्वाना आता माहित झाले होते, कि मी पावसाचा खरा-खुरा मित्र आहे, पावसाकडे मी फक्त बोललो कि लगेच तो धावत येतो, हे सर्वाना आतापर्यंत चांगलेच कळले होते.

     मग मीही जास्त गर्व न बाळगता, जास्त आढेवेढे न घेता माझ्या मित्राला येण्यासाठी विनवू लागलो.त्याची आर्जव करू लागलो, पण मग त्याने  हि जास्त वेळ न लावता पृथ्वीवर एन्ट्री घेतली, मला जास्त ताटकळत ठेवणे त्याला आवडले नसावे. बहुधा मैत्रीची साद हाक ऐकून तो तत्क्षणीच धावत आला होता. सर्वांनी हे पाहून नवलाने तोंडात बोटे घातली, कि गेले किती दिवस पाउस नव्हता, आणि आता असा काय अचानक पडतोय बाबा, त्यांनी मला याचे सिक्रेट विचारले तेव्हा मी त्यांना म्हटले कि यात काहीही विशेष नाही कि माझी काही जादू वगैरे नाही. तर त्यासाठी  एक तळमळ कळकळ ओढ लागते, ती हाक त्याला मनापासून द्यावी लागते. पहा तुम्हीही हे करून पहा, तुम्हालाही जमेल मग तुमच्याही हाकेला तो झणीच धावून येईल व आपल्या प्रेम-वर्षावात अपार भिजवून टाकेल.

     तर अश्या या पावसाचे व माझे एक जन्मो-जन्मीचे नाते आहे असे वाटते. वास्तविक आम्ही दोघेही या निसर्गाचे सुपुत्र, त्याचा आत्मा व माझा आत्मा हि एकच. म्हणून माझ्या या आत्म्याची हाक ऐकूनच तो धावत आला होता, अगदी देवासारखा.

     माझी  या माझ्या मित्राकडे एक विनंती आहे कि जोपर्यंत आपली मैत्री आहे, तोवर ती  जोपासण्याचा मनापासून प्रयत्न करूया, असेच त्याने आम्हा मानवांना भेटण्यास दरसाल दरवर्षी यावे, अगदी न चुकता, सर्वाना प्रेम जल द्यावे, चिंब भिजवावे, प्रेम तुषारांनी न्हाऊ घालावे त्यांना जगवावे, एक नव-जीवन द्यावे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.07.2021-शनिवार.