II श्री सूर्यदेवो नमः II - श्री सूर्यदेवाची महती आणि माहिती

Started by Atul Kaviraje, August 01, 2021, 12:10:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           II श्री सूर्यदेवो नमः II
                          --------------------

                     श्री सूर्यदेवाची महती आणि माहिती
                    -------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

      आज आपण या लेखाच्या माध्यमातून अखंड पृथ्वीचे पालनहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसचं, आपल्या तेजाच्या प्रकाशाने संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमान करणारे सूर्यदेव यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.  तरी, आपण सर्वांनी या लेखाचे महत्व समजून घेऊन इतरांना देखील सांगा.

     संपूर्ण पृथ्वीला आपल्या तेजाच्या प्रकाशाने प्रकाशित करणारे आणि जनसामान्यांच्या दृष्टीस पडणारे या भूलोकांतील एकमेव भगवान म्हणजे सूर्यदेव आणि चंद्रदेव होत. दिवसा सूर्यदेव आपल्या किरणांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना उर्जा आणि प्रकाश देत असतात.

     सूर्य देवापासून मिळणाऱ्या उर्जेमुळे आणि प्रकाशाच्या साह्याने वृक्ष आपले अन्न तयार करीत असतात. तसचं, वृक्षांना आवश्यक असणारी उर्जा मिळत असल्याने त्यांची वाढ सुद्धा होते. पृथ्वीवर होत असलेला वातावरणातील तसचं, ऋतूतील बद्ल हा सूर्य देवामुळेच होतो.

     म्हणून त्यांना सृष्टीचे पालनहार म्हटल जाते. पूर्वजांपासून आपण पाहत आलो आहे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी रोज सकाळी उठल्यानंतर प्रथम सूर्य देवाला हात जोडून नमस्कार करतात. तसचं, सूर्य देवाला जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात. सूर्य देवाचे आपल्या मानवी जीवनांत अनन्य साधारण महत्व असून आपण नियमित त्यांचे पूजन केलं पाहिजे. तसचं, त्यांना प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेव आरतीचे पठन केलं पाहिजे.

     हिंदू धार्मिक विविध ग्रंथांमध्ये सूर्य देवाचे वेगवेगळ्याप्रकारे वर्णन करण्यात आलं आहे. त्यामुळे वैदिक काळापासूनच सूर्य देवाची उपासना करण्याची परंपरा चालत आलेली आहे. तसचं, वेद ग्रंथांतील अनेक कथांमध्ये देखील सूर्यदेवाचे महत्व सांगण्यात आलं आहे.

     तर, पुराणांमध्ये सूर्य देवाच्या उत्पत्ती पासून त्यांच्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे वर्णन करण्यात आलं आहे. पुराणातील कथांचे वाचन केल्यास आपणास सूर्य देवाचा प्रभाव कळून येईल. तसचं,त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती म्हणून पठन करण्यात येत असलेल्या स्तोत्राचे लिखाण देखील केलं आहे.

     वेद आणि पुराणानानुसार ज्योतिष शास्त्रात देखील त्यांना विशेष महत्व दिल असून त्यांना  सर्व नऊ ग्रहांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलं आहे. अश्या प्रकारे हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये सूर्यदेवाचे वेगवेगळ्या प्रकारे महत्व सांगून त्यांचे वर्णन केलं गेल आहे.

     सूर्य देवाच्या उत्पत्ती संबंधी असे सांगण्यात येते की, मार्कंडेय पुराणानुसार पृथ्वीची रचना होण्याआधी संपूर्ण पृथ्वी प्रकाश रहित होती. यानंतर ब्रह्माजी प्रकट झाले आणि त्यांच्या मुखातून प्रथम शब्द निघाला तो ॐ जे सूर्य देवाचे सूक्ष्म रुपी तेज रूप होते.

     यानंतर ब्रह्माजीच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले आणि ते ॐ शब्दाच्या प्रकाशात सामावले. या चार वेदांपासून निर्माण झालेले तेज म्हणजेच सूर्य देव हे पृथ्वीचे पालनहर असण्याचे मुख्य कारण आहे. पृथ्वीची रचना करतांना ब्रह्माजिचे पुत्र मारिच यांचा जन्म झाला. मारिच यांनी आपले पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह आदिती नामक स्त्री सोबत झाला.

     आदिती यांनी कठोर तप करून भगवान सूर्यदेव यांना प्रसन्न केलं आणि त्यांनी आदिती यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या गर्भात प्रवेश केला. गर्भ धारणा केलं असतांना देखील आदिती चांद्रयान सारखे कठीण व्रत करू लागल्या. राणी आदिती यांचे व्रत पाहून राजा कश्यप खूप क्रोधीत झाले आणि राणी आदिती यांना सांगू लागले की, असे कठोर व्रत केल्याने गर्भातील बाळाचे निधन होईल.

     राजा कश्यप यांचे म्हणने ऐकल्यानंतर राणी आदिती यांनी आपल्या गर्भातील बाळ बाहेर काढून टाकले. राणी आदिती यांनी आपल्या गर्भातून काढलेले बाळ म्हणजे सूर्यदेव होत. राणी अदिती यांना मारिचमअन्डम म्हटल जात असल्याने हे बाळ मार्तंड नावाने प्रसिद्ध झाले.

     ब्रह्मपुराणात राणी अदिती यांच्या गर्भातून जन्मलेल्या भगवान सूर्य देव यांच्या अंशाला विवस्वान म्हटल आहे.


           (साभार आणि सौजन्य - माझीमराठी .कॉम)
         -----------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.08.2021-रविवार.