उरल्यात फक्त आठवणी-विरह कविता-"मूक आसवांची तुला श्रद्धांजली"

Started by Atul Kaviraje, August 02, 2021, 12:05:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
 
     आज फक्त त्या आठवणीच उरल्यात. त्या आठवणींवरच आता जगायचे. एके काळी तू होतीस, तुझे अस्तित्त्व होते, तुझं हसणं होत, तुझं रुसणं होत. तुझं मधुर बोलणं होत, माझ्याकडे एकटक पहाणं होत. पण आता ते सर्व काळाच्या पडद्या-आड गेलंय. क्रूर नियतीने तुला माझ्यापासून हिरावून नेलंय. डोळ्यांत अश्रू आहेत, पण तेही मूक आहेत. अबोल आहेत.

     मित्रांनो, माझ्या या पुढील प्रस्तुत विरह-कवितेतून तुम्हा माझ्या मनीच्या भावनांचा प्रत्यक्ष प्रत्यय येईल. ऐकुया तर, तिच्या उरलेल्या आठवणींना आठवूनच, तिला माझ्या आसवांची मूक श्रद्धान्जली मी देत आहे. कवितेचे शीर्षक आहे-"मूक आसवांची तुला श्रद्धांजली"


                     उरल्यात फक्त आठवणी-विरह कविता
                        "मूक आसवांची तुला श्रद्धांजली"
                    -----------------------------------
                                   
                       
मजकडे ते एकटक पहाणे
वाटत,ऐकावं तुझे-ते मधुर बोलणे
पण उलटून गेलीय रात्रकाळी केव्हाची,
मज आज एकाकीच ठेवून.

     माझं जीवन तूच होतीस
     माझं मनही तूच होतीस
     डोळ्यांतून वहातंय आज पाणी,
     आता उरल्यात फक्त आठवणी.

रोज वाटत तू येशील
तिन्हीसांजेला, कमानीस हलकेच टेकतो
क्षितिजावरल्या त्या गडद पखरणीत,
मी तुझी तीच छबी पाहतो.

     काळाने सर्व घेतलं होत हिरावून
     माझे सुख,माझा प्राण, सर्वकाळ
     त्याच काळाने विसरावयास लावलाय,
     माझा भूतकाळ,आजचा वर्तमानकाळ.

वाटचाल भविष्याची करताना नकळत
पावलांत पावले होती अडखळली
डोळ्यांतून दोन भावना-फुले टपटपली,
हीच मूक आसवांची तुला श्रद्धांजली. 


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.08.2021-सोमवार.