रेल्वे वास्तव चारोळया-" रेल्वे-रूळ खडी भरणाऱ्या मजुरांचे मनोगत"

Started by Atul Kaviraje, August 03, 2021, 02:13:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     रेल्वे वास्तव चारोळया
     " रेल्वे-रूळ खडी भरणाऱ्या मजुरांचे मनोगत"-(भाग-१)
     -----------------------------------------------


(१)
रूळांवरचे जीवन आहे जोखमीचे आमचे
डोळ्यांत तेल घालून काम करावे लागते येथे
कान असतात लागलेले नेहमीच गाडीच्या आवाजाकडे,
अन धावत वाजत येणाऱ्या कर्ण-कटू भोंग्याकडे.

(२)
दगड फोडणे,त्यांची खडी करणे
खडी भरणे, त्यांना रुळांत व्यवस्थित दाबणे
सतत दगडांशीच खेळ सुरु असतो आमचा,
खडींसहच खडा पहारा असतो सतत आमचा.

(३)
दुतर्फा धावणाऱ्या गाड्यांमधोमध रेल्वेच्या
आमचे जीवावरले काम बिनभोबाट सुरु असते
लाल झंडी,हरी झंडीचे काय पडलय आम्हाला,
जुंपुनच घेतलंय बिनधास्तपणे या धोकेबाज कामाला.

(४)
खडी फोडणाऱ्या हातांना घट्टे पडत चाललेत
पण कामात नाही सापडणार कधीही कसूर
जबाबदारीच्या कामाचा विडा उचललाय आम्ही,
गाडीच्या आवाजातच मिळवलाय आम्ही आमचा सूर.

(५)
धावणाऱ्या गाडीतून डोकावतात नजरा प्रश्नांच्या
डोळ्यांत भाव दिसून येतात, आश्चर्याचे
कामाची पावती  त्यांच्या पहाण्यातच मिळते,
सहानुभूती आमच्यावरली अंतरातून उमटून येते.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.08.2021-मंगळवार.