म्हणी - "अगं अगं म्हशी मला कोठे नेशी"

Started by Atul Kaviraje, August 04, 2021, 12:18:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     'चारोळी व म्हणी" या विषय अंतर्गत मी आजपासून "म्हणी" सुरु करीत आहे , म्हणी आणि त्यांचे अर्थ यातून तुम्हाला सापडतील . आजची म्हण आहे -  "अगं अगं म्हशी मला कोठे नेशी"

                                 म्हणी
                              क्रमांक - १
                            ------------


(1) "अगं अगं म्हशी मला कोठे नेशी"
    -------------------------------
     स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

     ( स्वतः करायचे  ते करायचे, वर दुसऱ्यावर भार टाकायचे , मनुष्याचा हा स्वभाव त्याच्या नकळत घडत असतो. कुठलेही काम करताना जर त्या कामात त्याला यश नाही मिळाले, अपयश आले, हे सर्व त्याच्याच चुकीमुळे तर घडत असते, तेव्हा हात झटकून आणि चक्क तो यासाठी दुसऱ्यास दोष देऊन मुक्त होत असतो. स्वतःवर या चुकीचे खापर तो कधीच ओढवून घेत नसतो, आणि ते दुसऱ्यावर ते फोडत असतो. या अर्थी ही म्हण आहे. कुठेतरी बदलून ही जबाबदारी त्याने आपल्यावर घ्यावी, असे माझे प्रांजळ मत आहे .)


         (साभार आणि सौजन्य  - महासराव .कॉम)
       ----------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.08.2021-बुधवार.