मार्मिक - विनोदी कविता - "खा तुम्ही CHICKEN STEW, करा BIRD FLUE ला FLEW"

Started by Atul Kaviraje, August 04, 2021, 01:30:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     बऱ्याच दिवसापूर्वी "बर्ड फ्लू", हा रोग, विकार, आजार अनेक पक्ष्यांमध्ये आढळून आला होत. त्यातल्या त्यात  या रोगाची जास्त लागण ही कोंबड्यामध्ये आढळून आली होती. बऱ्याच कोंबड्या यामुळे, मृत्युमुखी पडल्या होत्या , तर लाखो कोंबड्याना, हा आजार सर्वत्र, दूरदूर पसरू नये म्हणून मारण्यात आले होते. नंतर बऱ्याच काळानंतर या बर्ड फ्लू वर सरकारला नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते. परंतु तोपर्यंत सर्व हॉटेल, घराघरातून चिकन खाणे, चिकन डिश करणे, हे सारे व्यर्ज्य होते. जेणेकरून माणसासही खाण्यातून या रोगाची लागण होऊ नये. सर्व खाटिकांचा व्यवसाय हा तात्पुरता बंद झाला होता. त्यांना तोटा सहन करावा लागत होता.

     पण, मित्रानो, या सर्व गोष्टींचा जास्त त्रास झाला होता, तो म्हणजे चिकन प्रेमी, चिकनचे खवय्ये यांना . त्यांचे चिकनचे प्रेम , चिकनची त्यांची आवड ही त्या काळी पूर्णपणे दडपून गेली होती. सरकारने बंदीच तशी आणली होती. परंतु त्यांची मांसाला चटावलेली जीभ त्यांना स्वस्थ बसू देईल तरच नवल. झाले, काही चिकन-प्रेमी समोर येऊन म्हणू लागले, कि हे बर्ड फ्लू वगैरे काहीही नाही, मागेही हे आलं होत, आणि यापुढेही हे येतंच राहील, म्हणून का आम्ही गप्प रहावं .

           आणि, एक दिवस हा चिकन -खवय्या, चिकन-प्रेमी समाज एकत्र आला आणि त्यांनी चक्क "चिकन फेस्टिवल"चे आयोजन केले. त्यात त्यांनी चिकनचे ए टू झेड पदार्थ सजवून ठेवून ते सर्वांना खाण्यासाठी खुले केले होते. चिकन प्रेमींसह इतरही उपाशी लोकांनी त्यावर मनसोक्त, यथोक्त ताव मारला हे सांगायलाच नको. सरकारच्या बंदी फर्मानापुढेही जाऊन , बर्ड फ्लू ला हरताळ फासून, आपल्या जिभेचे चोचले पुरवून घेतले होते.आता, काय म्हणावे या खाबू-गिरीला ? हा आजार, रोग टळेस्तोवर थोडे थांबता आलेही असते, परंतु माणसाची ही उतावळी मनस्थिती, त्याला उगी राहू देत नाही. त्याचा मनावरचा संयम टळू लागून, तो या बऱ्याच गोष्टींना मग बळी पडू लागतो. तेव्हा मित्रांनो, आपल्या मनावरचे नियंत्रण हे फार महत्त्वाचे असते. असो, एक विनोदी, मार्मिक कविता उपरोक्त विषयावर सुचली आहे, कवितेचे शीर्षक आहे-"खा तुम्ही CHICKEN STEW, करा BIRD FLUE ला FLEW"


   विषय - BIRD FLUE च्या काळात CHICKEN FESTIVAL चे आयोजन
   ----------------------------------------------------------------

                      मार्मिक - विनोदी कविता

  "खा तुम्ही CHICKEN STEW, करा BIRD FLUE ला FLEW"
  --------------------------------------------------------


फ्लूने देखील पहिला नाही प्राणी
फ्लूने  देखील पहिला नाही माणूस
फ्लूने देखील पहिला नाही पक्षी,
होते जगातील सारे डॉक्टर यास साक्षी. 

बर्ड ना आज फ्लू ची झालीय लागण
न भूतो न भविष्यती असा हा पक्षी विकार
याला नाही आकार, नाही कुठला प्रकार,
माणूस यावर करीत होता शेवट-पर्यंत विचार.

कुठून आला हा माहित नाही
कोणाकडून लागला गेला हेही माहित नाही
कसा सर्वत्र पसरला , हे तर ज्ञातच नाही,
ज्ञान फारच तोकडे पडले यात सारेच काही.

मुख्यत्वे अंतर्भाव झाला याचा सर्व कोंबड्यांत
अक्षरशः लाखो कोंबड्याना झाली याची लागण
आणिक याचा विषाणू पसरू नये इतरत्र,
काळजी याची घेतली जात होती सर्वत्र.

सर्वतोपरी बाद झाले चिकन पदार्थ ताटातून
खाटीक सारे बसून मलिदा मळू लागले
सुऱ्या त्यांच्या बोथट झाल्या धारदार, लखलखत्या,
आणिक त्यांचेवर गंजांचे पुट चढू लागले.

पण एक समाज असाही होता इथे
मान्य नव्हते त्यास हे बर्ड फ्लू चे थोतांड
चिकनचे खवय्ये होते आज मनापासून नाराज,
म्हणत होते रचलंय कुणीतरी हे मुद्दामच कुभांड.

आमचा घास हिरावून घेतलाय तोंडातला
चिकनशिवाय आम्ही नाही राहू शकत
एखादा तरी पदार्थ रोज लागतो ताटात,
कोंबडीशिवाय आम्ही काही खाऊही नाही शकत.

समस्या ही गंभीर पसरत होती सर्वत्र
पण काळजी  नव्हती त्यांना बिलकुलच नाम-मात्र
या समाजाला (खवय्यांना) अंती नाही राहावले,
चिकन - प्रेम त्यांचे या रोगावर (बर्ड-फ्लू) मात करून गेले.

काहीही होत नाही,अगदी भरपूर खा
काहीही बिघडत नाही, अगदी पोटभर खा
काहीही त्रास नाही,अगदी मनसोक्त खा,
खवय्या असे म्हणत होता, सारखा-सारखा.

खवय्यांची खवय्येगिरी वाढतच चालली होती
स्वप्नांतही त्यांना चिकन-डिश च दिसत होती
न-राहवून, असह्य होऊन अंती ते सारे एकत्र आले,
आणि  चक्क एका " CHICKEN FESTIVAL " चे त्यांनी आयोजन केले.

तुटून पडले सारे खवय्ये,करीत दो-हस्ते लढाई
अजून द्या,आणि खाईन मी, मारू लागले बढाई
बर्ड-फ्लू चा सारा इशारा गेला होता चुलीत,
चिकन-तंगड्या खात होते भाजून ते, गरम-तप्त ग्रिलीत.

इतकेही जिभेचे चोचले नसावेत, कि जीभ सैल सुटावी
संयम बाळगून त्याप्रमाणे, तशी वर्तणूक व्हावी
थोडे थांबले तर कोठेही,बिघडत नाहीच केव्हाच,
हे अनिष्ट घातकी संकट टाळता येईल तेव्हाच.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.08.2021-बुधवार.