खुसखुशीत मार्मिक मोबाईली चारोळ्या - "सारे घर केलयं काबीज मोबाईलने"

Started by Atul Kaviraje, August 04, 2021, 02:25:15 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

              खुसखुशीत मार्मिक मोबाईली चारोळ्या

         "सारे घर केलयं काबीज मोबाईलने"- (भाग-१)
         ---------------------------------------


१)  नवरा बायकोत होत नाहीत वाद
     घर झालंय नुसते आबादी-आबाद
     जेव्हापासून मोबाईल घरो-घरी आले,
     शेजाऱ्यांचे चेहरे पहा कसे हिरमुसले.

२)  नवरा बायकोत नाही होत भांडण
     भावंडे नाहीत मस्ती करीत अकारण
     जेव्हापासून मोबाईलचे झालंय घरी अति-क्रमण,
     अख्ख्या कुटुंबाचे सुरु झालंय जागरण.

३)  मोबाईलवरून मी जेवण मागवतो
     मोबाईलवरून मी पिझ्झा मागवतो
     उठणे, बसणे, फिरणे न झाल्यामुळे,
     भविष्यात मी असंख्य रोगांना बळी पडतो.

४)  माझा वेगळा, बायकोचा वेगळा
     मुलाचा वेगळा, मुलीचा वेगळा
     मोबाईलमुळे सारे राहू लागलेत वेगळे,
     वागणं साऱ्यांचेच झालंय नामा-निराळे.

५)  किचनमधून बायकोचा फोन आला
     पाने वाढलीत, जेवून घ्या !
     बेडरूममधून मी ओरडलो, मला नाही फुरसत,
     मला माझे ताट इथेच आणून द्या !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.08.2021-बुधवार.