चहा- चारोळ्या - " नाक्या-नाक्यांवरील गरम चहाची टपरी "

Started by Atul Kaviraje, August 05, 2021, 10:31:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            चहा- चारोळ्या
         " नाक्या-नाक्यांवरील गरम चहाची टपरी "-(भाग-१)
         --------------------------------------------


(१)
गरम-गरम वाफाळलेला चहा कुणाला नको असतो
गरज असता, तल्लफ भागविण्या तोच पुरेसा असतो
घर असो वा ढाबा, हॉटेल असो वा टपरी,
जिभेवर चव-चटका घेण्यास तयारच असतात सारी.

(२)
आज गल्लो-गल्ली चहाचे स्टोलवरील  बस्तान आढळेल
आज वळण-वळणांवर चहाचे छोटेखानी दुकान सापडेल
चवी-चवीने घोट गरमा-गरम पोटात ढकलता,
तरतरी, उत्साहाचे एक अनोखे सुरस-पानच गवसेल.

(३)
श्रीमंत गरीब कधीच नसतो येथे भेद
लहान मोठा कधीच नसतो येथे वाद
सारेच उभे असतात एकत्र इथे टपरीवर,
कधीच आढळत नाही त्यांच्यात इथे अंतर.

(४)
चहा-टपरीवर गरिबांचे सर्व घर चालते
कुटुंबाची त्याच्यावर मोठी जबाबदारी असते
योग्य पर्याय आज निवडलाय त्याने,
चहाला अगदी सगळीकडेच मार्केट असते.

(५)
दमून भागून काम करून थकून
प्रत्येकजण आळसावलेल्या तना-मनाने घरी येत असतो
घर कितीही जवळ असले तरी,
नाक्यावरचाच चहा त्याचा उत्साह वाढवत असतो.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.08.2021-गुरुवार.