म्हणी- "आयत्या बिळात नागोबा"

Started by Atul Kaviraje, August 07, 2021, 12:50:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आयत्या बिळात नागोबा"

                                     म्हणी
                                  क्रमांक -4
                          "आयत्या बिळात नागोबा"
                         ------------------------


(4)  आयत्या बिळात नागोबा
     ----------------------
     (दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.)
     (एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.)
     (दुसऱ्याच्या मेहनतीवर / कर्तुत्वावर आयता ताबा मिळवणे व हक्क सांगणे .)


        (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
      --------------------------------------------

     आयत्या बिळावर नागोबा, अर्थात कोणी तरी जीवापाड मेहनत घेऊन एखादी गोष्ट करते, व नंतर दुसरा त्यावर आपला मालकी हक्क  गाजवतो.

     एक उदाहरण सांगतो. एका गावात दोन भाऊ राहतात. मोठा भाऊ नोकरी निमित्त बाहेरगावी असतो. लहानभाऊ गावी वडिलांबरोबर रहातो व शेती करतो.

     आपल्या मेहनतीने शेतात राब राब राबतो. कोरडवाहू शेती पण विहीर, पाईप लाईन व छोटेसे टुमदार घर अशी प्रगती करतो. खरे तर शेती वर उदरनिर्वाह होत नसल्याने मोठा भाऊ गाव सोडतो.

     अशातच वडिलांचं देहांत होते उत्तर कार्य आटोपल्यावर लगेच मोठा भाऊ सर्व गोष्टी मध्ये अर्धा वाटा मागतो.

     शेतीत उदरनिर्वाह होत नाही, म्हणुन धाकला भाऊ सर्व परीने मेहनत करतो, पण मोठा भाऊ काही न करता अर्धा वाटा घेतो, यालाच म्हणतात, "आयत्या बिळात नागोबा"


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.08.2021-शनिवार.