हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र - लेख

Started by Atul Kaviraje, August 07, 2021, 10:39:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                         II बजरंग बली हनुमान की जय II
                        -------------------------------
                           
मित्र/मैत्रिणींनो,

     आज शनिवार. बजरंग-बली चा वार. आज ऐकुया हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्राच्या महतीवर एक लेख. 


                         हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र
                      ----------------------------------

     या पैकी काहीही रोज म्हणणार्‍याला साडेसाती कधी आली आणि कधी गेली कळणारच नाही. ज्योतिषशास्त्रात जे ग्रह असतात ते म्हणजे आमच्या दोषांमुळे, आजुबाजुंच्या व्यक्तींच्या दोषांमुळे, परिस्थितीच्या दोषांमुळे आमच्या जीवनात काय काय घडू शकतं? त्या शक्यतांची  माहिती स्त्रोत, म्हणजे संकेत स्थळं. साडेसाती म्हणजे काय? त्या साडेसात वर्षांमधे शनै: शनै: म्हणजे अतिशय हळूहळू आपले चुका, दोष आपोआप वाढू लागतात, चांगले गुण आपोआप कमी होऊ लागतात. आपल्याला कळणारही नाही इतक्या धिम्या गतीने वाईट माणसं संपर्कात येतात व चांगली माणसं/स्थिती निघून जातात. हे आपल्याला पुर्णपणे गाफिल ठेऊन घडतं. सगळे बदल निगेटिव्ह असल्याने आपल्याला साडेसातीचा धाक असला पाहिजे पण भीती नसावी. कारण पुराणकथांनुसार त्या शनीला हनुमंताने पायाखाली दाबून धरलाय. याचा खरा अर्थ असा की----


भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वानरी अंजनीसूता रामदुता प्रभंजना ||

     हे प्रभंजन, प्रचंड मोठं वादळ काय करतं? ----

आणिला मागुता नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||

     ही जी हळूहळू वाईट दिशेने जाणारी गती आहे, तिला आपल्या प्रभंजन गतीने बाहेर काढतं. पण हनुमंताची उपासना निस्सिम भक्तीने करायला हवी. साडेसाती आली रे आली की मारुतीच्या देवळात जाऊन त्याच्या डोक्यावर तेल थापून परत आलं म्हणजे भक्ती नव्हे. ही तर भीतीने केलेली उपासना आहे जिचा स्विकार देव कधीच करत नाही. आपण रोज जर प्रेमाने हनुमंताची उपासना करत असू तर ती शनै: शनै: (हळूहळू) होत जाणारी वाईट स्थिती आमच्या आयुष्यात कधी येऊच शकणार नाही. साडेसातीतच हनुमंताला आपलं तोंड दाखवायचं आणि एरव्ही कोण हनुमंत आणि कोण मी? पण हनुमान चलिसा मधे म्ह्टल्याप्रमाणे "हनुमत सेई सरर्ब सुख करई" किंवा "पवनतनय संकट हरन मंगल मुरति रुप" या नुसार तो मंगलमुर्तीही आहे जसा तो 'सुखकर्ता दु:खहर्ता' गणपती आहे. पण गणपती हा घनप्राण आहे व तरलप्राण्-महाप्राण हा हनुमंत आहे. परंतु, आपल्या भौतिक गतीमधे जी शनै: शनै: गती असते ती घनप्राणातून निर्माण होत नसते. त्यामुळे गणपतीच्या उपासनेपेक्षा हनुमंताचीच उपासना कामाला येते.

     ज्योतिषाचा उपयोग इथे आहे पण तो फक्त साडेसाती कधी आहे ते जाणण्यासाठी पण पुर्ण मागे लागू नये. याचं कारण म्हणजे ज्योतिषशास्त्राच्याही पलिकडे अमर्याद पसरलेलं अध्यात्मशास्त्र आहे, जे आपली वाईट ग्रहस्थिती (संकेतस्थळांची रचना) बदलवू शकतं, चांगल्या ग्रहस्थितीला पुढे फलितात रुपांतर करु शकतं. एखादा योगी/हस्तसामुद्रिक जाणणारा/पत्रिका पाहू शकणारा, तुमच्या संकेत स्थळांनुसार तुम्ही काय प्रारब्ध घेऊन आलात ते ढोबळ मानानं सांगु शकतो, तुम्हाला हवं ते घडण्यासाठी एकवेळ उपायही सांगू शकतो. परंतु खरा सद्गुरु मात्र तुम्हाला काय हवं ते आणि तेच न बघता तुमच्यासाठी खरोखर काय योग्य आहे ते आणि तेच बघतो व त्याप्रमाणे देतो.


       (साभार आणि सौजन्य-संदर्भ मायबोली .कॉम)
      -----------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.08.2021-शनिवार.