मुक्त -हास्य प्रेम -कविता-"अशीच हसू उधळीत रहा , हास्यात फुले फुलवीत रहा .

Started by Atul Kaviraje, August 08, 2021, 12:18:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

    प्रियकराला  आज  त्याच्या  प्रेयसीमध्ये  काहीतरी   वेगळे , निराळे  असे  भासतेय . तिचे  बोलके  डोळे,  त्या  डोळ्यांतून  येणारे  भाव  त्याला  जणू  मोहिनीच  घालताहेत . ओठांनीही  आपले  बोलणे  तिच्या  जादूभऱ्या  नयनांकडेच  दिल्यासारखे  त्याला  भासू  लागलंय . भरीस  भर , म्हणजे  तिचे  हास्य . हसताना  तर  ती  त्याला  अधिकच  मोहक  दिसू  लागली  आहे . मध , शर्करेहूनही  अधिक  गोडं  असे  तिचे  मधाळ  हास्य  तिचा  सारा  चेहराच  अति -सुंदर  करून  गेलाय .

    अशी  ही  तिची  गोडं  हास्यात  बुडालेली  प्रेम -मूर्ती  त्याच्या  अगदी  निकटच  आहे . त्याला  असं  वाटू  लागलयं  की  असंच  तिने  हसत  रहावं  आणि  मी  तिच्याकडे  पहात  रहावं , तिच्या  ओठातल्या  हास्याच्या  प्रेमात  बुडून  त्या  प्रेमामृताचे  प्राशन  करीत  राहावं . मित्रांनो , ऐकुया  तर , या  दैवी  हास्य  प्राप्त  झालेल्या  त्या  प्रेमिकेची   प्रेम -आळवणी , तिच्याच  प्रेमीच्या  शब्दांत  कवितारूपे . कवितेचे  शीर्षक  आहे - "अशीच  हसू  उधळीत  रहा , हास्यातुन  फुले  फुलवीत  रहा  ."


                     मुक्त -हास्य  प्रेम -कविता
    "अशीच  हसू  उधळीत  रहा , हास्यात  फुले  फुलवीत  रहा ."
   -------------------------------------------------------
         

प्रिये,

औत्सुक्य तुझ्या डोळ्यातून ओसंडलेय
नजरेतील भाव काही बोललेय
नयन तुझे जादूभरे प्रिये सदैव,
वाटत काही सांगायचे राहून गेलेय.

शब्द तुझे अपुरे पडलेत येथे
ते डोळ्यावाटे प्रकट झालेत
नयनांची भाषा तुझी परिपूर्ण,
शब्दानाही अबोल करून गेलेत.

प्रिये अशीच हसू उधळीत रहा
पहाता  तुज माझे भानही हरपले
मुखाचा गोडवा शर्करेहुनी  मधुर,
हसण्यात तुझ्या  ते अजूनच घोळले.

तुझ्याकडे  पहात  राहावंसं  वाटतंय
प्रेमा -मृताचे  प्राशन  करावंसं  वाटतंय
मजवरी  प्रेमाचा  वर्षाव  करणारे  हास्य ,
असंच  राहू  दे  सदैव ओठांवर विलसत .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2021-रविवार.