आषाढी अमावास्या - II गटारीच्या हार्दिक शुभेच्छा II

Started by Atul Kaviraje, August 08, 2021, 02:02:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज आषाढी अमावास्या आहे. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वीची ही अमावस्या म्हणून  हिची चांगलीच ओळख आहे. हिला गटारी अमावास्या म्हणूही ओळखले जाते. या अमावास्येच्या आपणा सर्वांस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर शुभेच्छापर काही चारोळ्या/कविता.


                            II  गटारीच्या हार्दिक शुभेच्छा II
                           ------------------------------


(1) संपली केंव्हाच आषाढीची वारी,
नंतर आहे गणपतीची बारी,
थोडेसच दिवस हातात आहेत,
जोरात साजरी करू या गटारी...
     गटारीच्या शुभेच्छा!

(2) कोंबडीचा रस्सा मटणाची साथ,
मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत...
     गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

(3) सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी,
चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी,
आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी,
पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा,
गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा...
    गटारीच्या शुभेच्छा!

(4) ओकू नका,
माकू नका,
फुकट मिळाली म्हणून,
ढोसू नका..
मिळेल त्या गटारीत लोळू नका...
     गटारीच्या शुभेच्छा!


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2021-रविवार.