" ग्रामस्थांच्या मागण्या अमान्य झाल्या,सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या"

Started by Atul Kaviraje, August 08, 2021, 02:53:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                विषय - सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या
                 व्यंग्य विनोदी मार्मिक राज-कारणी चारोळ्या
  " ग्रामस्थांच्या मागण्या अमान्य झाल्या,सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या"
--------------------------------------------------------------------
                                     (भाग-१)
                                    ---------


(१)
गावकरी उपोषण करुन मेटाकुटीस आले होते
त्यांचे म्हणणे, गाऱ्हाणे सरपंच ऐकून घेत नव्हते
सभेस मशाली, पलिते घेऊन संतप्त गावकरी उभे होते,
काहीतरी पेटून टाकण्यासाठी अक्षरशः ते पेटले होते.

(२)
सरपंच आणि उपसरपंच का असे वागतात ?
त्यांना काय सारे अधिकार प्राप्त असतात ?
खुर्ची मिळाली म्हणून उतू नये मातु नये,
जनतेने त्यांना पुढे कधीही निवडून देऊ नये. 

(३)
हे जाळपोळीचे प्रकार आतासे वाढत चाललेत
तू नाही तर दुसरे काही, राग काढत चाललेत
वेळेवर सरपंच उपसरपंच कधीच नाहीत भेटत,
म्हणून का लोक चाललेत आंधळेपणाने त्यांच्या खुर्च्या पेटवत ?

(४)
आज सरपंच, उपसरपंचांचा आधारच निखळला होता
आज त्यांचेवर उभे राहण्याचा बाका  प्रसंग आला होता
ज्या खुर्चीवर होती त्यांची आजवर सारी मदार,
त्या खूर्चीचाच ऑफिसात राखेचा ढिगारा लागला होता.

(५)
ही पुढची न बोलता दिलेली धमकी तर नव्हे ?
अबोल जनता आता कधीच मूक नाही राहाणार
या खुर्ची नंतर तुमचाच नंबर लागणार आहे,
हाच गर्भितार्थ सरपंच-उपसरपंच कधी बरे समजणार ?


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2021-रविवार.