II आषाढी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा II- ( लेख क्रमांक -2)

Started by Atul Kaviraje, August 08, 2021, 02:33:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                II  आषाढी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा II
               ----------------------------------------
                       

मित्र/मैत्रिणींनो,

     आज आषाढी अमावास्या आहे. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वीची ही अमावस्या म्हणून  हिची चांगलीच ओळख आहे. हिला गटारी अमावास्या म्हणूही ओळखले जाते. या अमावास्येच्या आपणा सर्वांस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर शुभेच्छापर लेख.


                     II  आषाढी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा II
                                   ( लेख क्रमांक -2)
                    ---------------------------------------

           
      गटारी अमावस्या 2021:------

     थोड्याच दिवसात मराठी महिन्यांमधील महत्वाचा महिना श्रावण महिना सुरु होणार आहे. हिंदु धर्मात श्रावण महिना खुपच महत्वाचा आणि शुभ मानला जातो. सर्व सणांचा विचार केला तर बऱ्यापैकी बरेच सण या महिन्यात असतात. हा महिना पवित्र मानला जात कारणाने बरेच लोक श्रावण महिना पाळतात जसे कि नॉनव्हेज खात नाही, मद्यपान करत नाही. म्हणुन आषाढ महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच आषाढी अमावस्या ( गटारी अमावस्या )पर्यंत नॉनव्हेज, मद्यपान करून घेतात कारण श्रावण महिन्यांनंतर गणपती येतात आणि तेव्हा पण नॉनव्हेज खाणे आणि मद्यपान करणे वर्ज्य मानले जाते.

     दीप अमावस्या कधी आहे:------

     बरेच लोक आषाढ अमावस्या ला गटारी अमावस्या असे ओळखतात. आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणुन देखील ओळखली जाते. यंदाची गटारी अमावस्या सुट्टीच्या दिवशी असल्याने नॉनव्हेज लव्हर्स तसेच मद्यप्रेमी नक्कीच खुश असतील.

     दीप अमावस्याचे महत्व:-----

     दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.

     आषाढ अमावस्या किंवा  गटारी अमावस्याला दीप अमावस्या म्हणतात. दीप अमावस्या चे वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे घासुन पुसुन घेतात. आणि संध्याकाळी ७,९,११ च्या आकड्यात कणकेचे दिवे तयार करून सर्व दिवे देवाजवळ लावतात आणि पूजा करतात.


              (साभार-संकलक-निकिता खर्चे)
             ----------------------------- 

       (साभार आणि सौजन्य-संदर्भ आयटेक मराठी)
       --------------------------------------- 


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2021-रविवार.