II श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा II - (लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, August 09, 2021, 10:51:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून श्रावण मासाची सुरुवात होत आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, श्रावणी सोमवारचे महत्त्व, आणि श्रावणी सोमवारच्या तारखा. 


                  II श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा II
                               (लेख क्रमांक-१)
                 -------------------------------------


      श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिना आहे, या महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना केली हे जाते.

     श्रावण महिन्याच्या सोमवारी आणि शनिवारी उपवास केले जातात. श्रावण सोमवार इच्छापूर्ती चा दिवस मानला जातो.

     श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पुजा केल्यामुळे त्यांना फळ प्राप्ती होते हि हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे.

     असे म्हणतात भगवान शंकर आणि पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते.

    या कारणा मुळे श्रावण सोमवार उपवास करतात.


               श्रावण महिना २०२१ कधी सुरु होतोय ?:-----
            ------------------------------------

     2021 या वर्षामध्ये श्रावण महिना 09 ऑगस्ट 2021 पासून सुरू होऊन 6 सप्टेंबर 2021 रोजी संपेल.

     यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येत आहेत त्याच्या पुढील तारखा आहेत:--

============================
पहिला श्रावण सोमवार  09 August 2021
दुसरा श्रावण सोमवार  16 August 2021
तिसरा श्रावण सोमवार  23 August 2021
चौथा श्रावण सोमवार  30 August 2021
पाचवा श्रावण सोमवार 06 September 2021
============================

--शंभो महादेवाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच
महादेवा चरणी प्रार्थना!
     श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!


     हे सात सावन, शिवांचे आशीर्वाद, शिवभक्ती, शिवाचे धैर्य, शिवांचा त्याग, शिवची संगती, शिवची शक्ती, शिवांचा अभिमान, जय शिवचा शंभू!

     ओम नमः शिवाय: शिव श्रावण महिन्याच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. देव भोले नाथ आपले जीवन आनंदाने भरू दे!

--निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
     श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


--निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या.

--पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा.


         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डोमकावळा .कॉम)
        --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2021-सोमवार.