II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II - (लेख क्रमांक -2)

Started by Atul Kaviraje, August 09, 2021, 12:26:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                  -----------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून श्रावण मासाची सुरुवात होत आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर श्रावण  सणाच्या निमित्ते, श्रावण महिन्याचे महत्त्व , व येणारे काही सण ,यावर  परिपूर्ण  लेख. 


                      II श्रावण महिना 2021: शुभेच्छा II
                                 (लेख  क्रमांक -2)
                     ---------------------------------

     नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखा मध्ये श्रावण महिन्याचे महत्व आणि श्रावण महिन्या बद्दल विशेष माहिती पाहणार आहोत.

            श्रावण महिन्याचे महत्व जाणून घेऊया :-----
          -----------------------------------

      श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात बरेच चांगले उपाय सांगण्यात आले आहेत यामागे महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहेत.

     श्रावण महिनात पावसाळ्यातील शेतीची बरीचशी कामे चाललेली असतात बाहेर धुवाधार पाऊस पडत असतो माणसे जास्त घरातच राहतात.

     आपल्या शरीराचे चलनवलन कमी होते अशावेळी आरोग्यासाठी लाभदायक असतो तो श्रावण महिना म्हणून या दिवसाचे उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.

     त्यामुळे आहारात बदल होतो आणि त्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते उत्सवामुळे माणसे एकत्र आल्याने मनाचे आरोग्य चांगले राहते.

     माणसे आनंद सोहळ्यात सामील झाल्याने आपले दुःख चिंता विसरतात. श्रावण शेतीची कामे पूर्ण होताच श्रावणाचा पहिला सण म्हणजे नागपंचमी.

     नागपंचमी उंदरांचा नाश म्हणून म्हणून नागेश शेतकऱ्यांचे मित्र समजले जातात त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी सण असतो.


     श्रावण महिन्यात सारी सृष्टी हिरवागार शालू नेसलेली असते व श्रावणातील प्रत्येक दिवस पर्यावरणाचे महत्व पटवून देणारा असतो.

      रविवारी आदित्य पूजन म्हणजे सृष्टीचा स्वामी सूर्य त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते सोमवारी सृष्टीचा सांभाळ करणाऱ्या  सूर्याला वंदन करायचे असते.

      मंगळवारी निर्मिती शक्तीच्या मंगळागौरीची पूजा करायची असते.

     बुधवारी बुध पूजन व गुरुवारी बृहस्पति पूजन तसेच शुक्रवारी दीर्घायुष्य करणारे जिवंतिका पूजनाने शनिवारी हनुमान पूजन करण्यासाठी सांगण्यात येते.

    नारळी पौर्णिमा हा श्रावणातील एक महत्त्वाचा सण  आहे, सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश करण्यापासून आपल्या येथे पावसाला प्रारंभ होतो.श्रावण पौर्णिमेपर्यंत मुसळधार पाऊस पडत असतो या काळात समुद्र हवामानात बदल होतो समुद्रही शांत होऊ लागतो.
श्रावण पूर्णिमा पासून मासेमारीसाठी समुद्रात होड्या सोडल्या जातात. समुद्राची देवता पूजा करून प्रार्थना केली जाते व श्रावण पुर्णीमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो.
रक्षा बंधनाचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे राज्याचे रक्षण करण्यासाठी राणी कर्मवतीने रक्षाबंधनाची प्रथा फार पूर्वीपासून आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि बहीण भावाचे नाते अधिक दृढ करते यांचे प्रतीक आहे.

    -- श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!


     श्रावण महिन्यात मध्य रात्री कृष्ण अष्टमी या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो व कृष्णाची पूजा करायची असते.

    -- तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारास श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!


     अमावस्या मातृदिन आणि ऋषी पूजन करतात थोडा या उत्सवाने श्रावण संपतो परंतु मानवाला निसर्ग प्रेमाची शिकवण देऊन जातो.

    काशीला तृप्त करतो संतुष्ट करतो तो माणसांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी प्रयत्न करून जातो.

     तसेच साहित्यिक कलावंत व आध्यात्मिक साधना करणार्‍यांना ही सर्वश्रेष्ठ सामान्य माणसांनाही श्रावण मास खूप आवडतो.

     श्रावण महिना मनातील दुःख दूर करून मन आनंदित करतो.

           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीकॉर्नर .कॉम)
         ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2021-सोमवार.