II नाग-पंचमी II - लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, August 13, 2021, 02:47:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II नाग-पंचमी II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी शुक्रवार, आणि श्रावणातला पहिला सण नागपंचमी आहे. आपणा सर्वाना नागपंचमीच्या अनेक शुभेच्छा. ऐकुया तर या दिवसाची महती, माहिती , लेख आणि कथा.


                       II नाग-पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                   लेख क्रमांक-१
                     ----------------------------------- 

                           
                      नागपंचमी माहिती:-----
                    ------------------

     नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागाची पूजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि मित्रांनो असेच करत राहिल्याने आशीर्वाद आपणास मिळतो.

      हा सण का साजरा केला जातो? परंपरा कोणती आहे?:-----
     --------------------------------------------------
                 
     आज आपण नागपंचमी विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्वाँना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात. या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला पंचमी असेही म्हणतात. नाग या प्राण्याबद्दल भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.

      वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी गावातील स्त्रिया एकत्र मिळून पारंपारिक वेषभूषा करून वारूळा जवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात. पाटावर हळद चंदनाने नाग नागिण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याना दूध, लाह्या, ,दूर्वा वाहून त्यांची पूजा करतात.या सणाला विशेष गव्हाची खीर यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची तयार केले जाते.

      आपल्या संस्कृतीमध्ये नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते. शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करतात. भगवान विष्णूंचा तर नाग हे  शेष आहेत कारण ते नागाच्या शेष शय्येत पहुडले आहेत. गणपती तर आपल्या कमरेला नाग बांधतात. तर या नागाची उत्पत्ती कशी आहे. तर पुराणकथां प्रमाणे नाग हे काश्यप आणि कद्रू यांचे पुत्र आहेत. यातील आठ नाग प्रसिद्ध आहेत. आठ नागांची नावे अशी-----

     पहिला अनंत, दुसरा वासुकी, तिसरा पद्म, चौथा महापद्म, पाचवा तक्षक, सहावा कर्कोटक , सातवा शंख आठवा कुलिक किंवा कालिया. तर हे जे नाग आहेत हे नाग लोकांना त्रास द्यायला लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडा कडून मारले जाल. म्हणूनच तेव्हापासून गरुड हा सापाला खातो.

      नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचवला जावो हे उपवास करण्यामागे एक कारण आहे. तसेच "वारुळाला नागोबाला पूजायाला" हे गीत गीतकार ग दि माडगूळकर यांचे, पंचमीची रंगत वाढवते . नाग आपल्याला जर कुठेच आढळून आला तर त्याला सर्प मित्रांच्या मदतीने अभयारण्यात सोडावे असे वक्तव्य सर्प मित्र करतात.

    सापामुळे उंदरांची संख्या आटोक्यात राहते. तो शेतकऱ्याचा मित्र देखील आहे. नागपंचमी सणाचा समाजात जनजागृती करणे हा उद्देश,  प्रत्येकाने लक्षात ठेवला तर खऱ्या अर्थाने सण  साजरा झाला असे म्हणता येईल.

                नागपंचमी कथा:-----
               ---------------

      या सणाची सुरुवात हि खूप प्राचीन काळापासून झालेली आहे. राजा परीक्षित नावाचा एक राजा होऊन गेला.एकदा हा राजा परीक्षित जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला असताना त्याला खूप तहान लागली होती.तेव्हा त्याला समोर एक झोपडी दिसली आणि तिथे त्यान पाहिलं शेजारी एक आश्रम होता. तिथे तो गेला तो आश्रम एका ऋषींचा होता.तिथे ऋषी तपश्‍चर्या करीत बसले असताना या राजा ने ऋषींना पिण्यास पाणी मागितले. मात्र तपश्चर्येला बसलेल्या  ऋषींनी राजाकडे लक्ष दिले नाही. यामुळे राजाला अतिशय राग आला.आणि राजाने ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला एक साप टाकला.  जवळच त्या ऋषींचा पुत्र तिथे शेजारी होता.त्याने पाहिलं व त्याला अत्यंत राग आला आणि त्याने राजाला शाप दिला. हे राजा तुला सातव्या दिवशी तक्षक नावाच्या सपाकडून तुला सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल. इकडे या शापाने राजा परीक्षित खूप घाबरला व्याकुळ  झाला. त्याने घरी येऊन आपल्या राजवाड्यात येऊन हि सर्व माहिती आपल्या कुटुंबियांना दिली.त्यांना एक मुलगा होता या मुलाने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी एक मोठा यज्ञ सुरु केला. यज्ञ सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नाग येऊ लागले आणि स्वतःला झोकून त्या यज्ञामध्ये जीव देऊ लागले.त्यानंतर सर्व नाग आस्तिक ऋषींना शरण गेले आणि त्यानंतर आस्तिक ऋषींनी राजाच्या  मुलाला सर्व काही जे झाले त्याबद्ल सांगितले. हि सर्व बाब लक्षात  घेऊन त्यानंतर परिस्थिती समजावून सांगितली. म्हणूनच हा शाप त्याला मिळालेला आहे.

     त्यानंतर राजाच्या मुलाने क्षमा मागून त्या दिवसापासून नाग देवांची पूजा करण्यास सुरुवात केल्याने त्या दिवसापासूनच नागपंचमी श्रावण महिन्यातील शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो.


                 (संकलक-शुभम  पवार)
               -----------------------

          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीकॉर्नर .कॉम)
        --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2021-शुक्रवार.