नागपंचमी कविता- "आला आला सण, नागपंचमीचा आज आला"

Started by Atul Kaviraje, August 13, 2021, 10:37:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    II नागपंचमीच्या  हार्दिक  शुभेच्छा II
                   ---------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज नाग-पंचमीचा सण. श्रावण महिन्यात येणार हा पहिलाच सण. म्हणूनच हा विशेष आहे. आपणा  सर्वांस नाग-पंचमीच्या अनेक शुभेच्छा. ऐकुया तर, नाग-पंचमीची खास कविता. कवितेचे शीर्षक आहे- "आला आला सण, नागपंचमीचा आज आला"


                             नागपंचमी कविता
               "आला आला सण, नागपंचमीचा आज आला"
              ----------------------------------------


आला आला सण, नागपंचमीचा आज आला
श्रावण शुद्ध पंचमीचे पावन दिवसाला
पावसाच्या सरीने भिजवून गेला,
आला आला सण, नागपंचमीचा आज आला,

श्रावणातल्या  या प्रथम सणाला
प्रथम मानाचे वंदन त्याला
स्थान मनामनात निर्माण करून,
आला आला सण, नागपंचमीचा आज आला.

परंपरा आजही जतन करुनी
जनामनात सणाचे पालन होऊनी
नागाला विशेष महत्त्व द्यावया,
आला आला सण, नागपंचमीचा आज आला.

हाती ताम्हण पंचारती घेउनी
हळद-कुंकू फुलांनी तबक सजवूनी
वर दूध, लाह्यांचा अभिषेक कराया,
महिला, मुली निघाल्या लगबग वारुळाला.

घराघरातून चित्र रेखाटलें भिंतीवरी
पिवळाजर्द नागोबा रेखांकित अवतरी
भक्तिभावे स्त्रिया पूजन करिती,
अन साकडे घालिती नाग-देवतेला.

अर्पिला प्रसाद लाह्या, दुधाचा नागास
प्रेमे स्त्रिया त्यास भरविती घास
विखारी फुत्कारही आज त्याचा,
सहजी निमाला या पावन पर्वाला.

गळ्यात स्थान नागाचे, शिव-शंकराच्या
डोईवर फणा उभारुनी, रक्षीतसे महादेवाला
तिन्ही लोकांचा आजानुबाहू, सर्व -शक्तिमान स्वामी,
नीलकंठ हा शोभतो, धारण करुनी नागाला.

श्रावण सणाचा होतो पर्व सुरु, नाग-पंचमीने
भक्ती-भावे पूजिती भक्त-गण, त्यास आनंदाने
रूप नागाचे आज आगळे, मनात देऊ स्थान त्याला,
आला आला सण, नागपंचमीचा आज आला.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.08.2021-शुक्रवार.