II नाग-पंचमी II - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, August 14, 2021, 12:07:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II नाग-पंचमी II
                               ----------------


     मित्रांनो, क्षमस्व, नाग पंचमीचा लेख क्रमांक - २, हा कालच लिहून तयार होता. परंतु वेळेअभावी तो मला काही काल पोस्ट करता आला नाही. तो मी आज म्हणजे दिनांक-१४.०८.२०२१-शनिवार रोजी पोस्ट करीत आहे. कृपया स्वीकार व्हावा, धन्यवाद.                               
                                   
मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी शुक्रवार, आणि श्रावणातला पहिला सण नागपंचमी आहे. आपणा सर्वाना नागपंचमीच्या अनेक शुभेच्छा. ऐकुया तर या दिवसाची महती, माहिती , लेख आणि कथा.


                       II नाग-पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                    लेख क्रमांक-2
                     -----------------------------------


    श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला पंचमी असेही म्हणतात. नाग या प्राण्याबद्दल भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवता ची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचवला जावो हे उपवास करण्यामागे एक कारण आहे.

                   नाग - पंचमी शुभेच्छा:-----
                  ---------------------   

1- कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी...
     नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

2 - मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
रक्षण करूया नागाचे,
जतन करूया आपल्या निसर्गाचे.
     नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

3- नागपंचमी
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी...
     नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

4 - भगवान शिव शंकरच्या गळ्यात सापांचा हार आहे.
नाग पंचमी हा महादेवाच्या भक्तांसाठी खास उत्सव आहे.
     🎕🎕नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎕🎕

5 -वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया...
     🌺नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!🌺


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2021-शनिवार.