II नाग-पंचमी II - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, August 14, 2021, 01:05:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II नाग-पंचमी II   
                             ----------------


     मित्रांनो, क्षमस्व, नाग पंचमीचा लेख क्रमांक -3 ,हा  कालच लिहून तयार होता. परंतु वेळेअभावी तो मला काही काल पोस्ट करता आला नाही. तो मी आज म्हणजे दिनांक-१४.०८.२०२१-शनिवार रोजी पोस्ट करीत  आहे. कृपया स्वीकार व्हावा, धन्यवाद.


मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी शुक्रवार, आणि श्रावणातला पहिला सण नागपंचमी आहे. आपणा सर्वाना नागपंचमीच्या अनेक शुभेच्छा. ऐकुया तर या दिवसाची महती, माहिती , लेख आणि कथा.


                      II नाग-पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा II
                                   लेख क्रमांक-3
                    -----------------------------------


                         नाग - पंचमी शुभेच्छा:-----
                        --------------------

   नागपंचमी शुभेच्छा Wishes in Marathi, Quotes, Status, SMS:-----
  ---------------------------------------------------------------

     नमस्कार मित्रांनो, आज नागपंचमी आहे. तर आज आपण नागपंचमी चे कोट्स मराठी मध्ये येथे देणार आहोत आणि तसेच नागपंचमी चे स्टेटस तुम्हाला आवडत असतील तर त्या अगोदर नागपंचमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण येथे नागपंचमी चे संदेश मराठी मध्ये पाहणार आहोत आणि ते तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर स्टेटस ठेवू शकता आणि तसेच आपण इमेजेस, एसएमएस, एमएसजी द्वारे नागपंचमी शुभेच्छा मराठीत सर्वांना पाठवू शकता व सोशल मेडिया द्वारे हा सण  साजरा करू शकता.

     नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते.या दिवशी नागाची पूजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि मित्रांनो असेच करत राहिल्याने आशीर्वाद आपणास मिळतो. आपल्या संस्कृतीमध्ये नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करतात. भगवान विष्णूंचा तर नाग हे शेष आहेत. कारण ते नागाच्या शेष शय्येवर पहुडले आहेत. गणपती तर आपल्या कमरेला नाग बांधतात. तर या नागाची उत्पत्ती कशी आहे.तर पुराणकथांत प्रमाणे नाग हे काश्यप आणि कद्रू यांचे पुत्र आहेत यातील आठ नाग प्रसिद्ध आहेत आठ नागांची नावे अशी-----

पहिला अनंत, दुसरा वासुकी, तिसरा पद्म, चौथा महापद्म, पाचवा तक्षक, सहावा कर्कोटक  , सातवा शंख आठवा कुलिक किंवा कालिया तर हे जे नाग आहेत हे नाग लोकांना त्रास द्यायला लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडा कडून मारले जाल, म्हणूनच गरुड  हा सापाला खातो.

     देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार. नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

     महादेवाचे लाडके नाग, तुमची सर्व कामे आनंदात होतील, जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील तुमच्या परिवारास नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

     सर्प देव तुमचे रक्षण करील, त्यांना दूध द्या, आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धीचा पाऊस होईल, नाग पंचमीचा हा शुभ सण तुमच्यासाठी  खास असेल - हॅपी नाग पंचमी 2021
आपणा सर्वांना नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

        II ओम भुजंगेय विद्महे, सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात II


     या नागपंचमीवर देवतांचा आशीर्वाद सदैव असो, लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन नेहमीच असले पाहिजे. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

     श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला पंचमी असेही म्हणतात. नाग या प्राण्याबद्दल भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवता ची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.

     भगवान शिव शंकरच्या गळ्यात सापांचा हार आहे. नाग पंचमी हा महादेवाच्या भक्तांसाठी खास उत्सव आहे.
     हर हर महादेव, जय शिव शंकर.

     त्याच्या आशीर्वादाने तुमच्या घरात पैसे कायम येत राहतील, आपणा सर्वांना नाग पंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

     "भगवान शिव आपल्या सर्वांना नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद देवो. शुभ नाग पंचमी!"

     या शुभदिनी भगवान शिव आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत. ते  तुम्हाला सुरक्षित, निरोगी ठेवो आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शक्ती देवो.
सर्वांना शुभेच्छा नाग पंचमी!

    भगवान शिव सर्वांना सामर्थ्य व शक्ती देतील. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास शुभेच्छा नाग पंचमी!

     नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचवला जावो हे उपवास करण्यामागे एक कारण आहे.

     नाग आपल्याला जर कुठेच आढळून आला तर त्याला सर्प मित्रांच्या मदतीने त्याला अभयारण्यात सोडावे असे वक्तव्य सर्प मित्र करतात.

     सापामुळे उंदरांची संख्या आटोक्यात राहते तो शेतकऱ्याचा मित्र देखील आहे. नागपंचमी सणाचा समाजात जनजागृती करणे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर खऱ्या अर्थाने हा सण साजरा झाला असे म्हणता येईल.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2021-शनिवार.