‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "पाहिजे पाऊस सरिंवर सरी "

Started by Atul Kaviraje, August 14, 2021, 02:21:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे पाचवे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " अनामिक कवी " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -" पाहिजे पाऊस सरिंवर सरी "


                             कविता पुष्प-पाचवे
                        "पाहिजे पाऊस सरिंवर सरी "
                      -----------------------------


शेतकरी व भाताचे पीक
     मनासारखे भाताचें हें रोपहि आलें जरी॥ पाहिजे पाऊस सरिंवर सरी ॥....
     मनासारखे भाताचें हें रोपहि आलें जरी॥ पाहिजे पाऊस सरिंवर सरी ॥....


'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या पावसाळ्याच्या अनुषंगाने भातशेतीचा सगळा प्रवास सांगणारी एका अज्ञात कवीची कविता.... 


किती प्रभूची थोर कृपा ही! भूमीवरती जला॥
पाडुनी ताप लया लाविला॥ध्रु.॥

जाऊं आता शेतावरती जमीन नांगरू बरी॥
कुळवही फिरवू तू तिचियावरी॥
झाली ती हो भुसभुसशीत, बी फेकूं तिचिया मधी॥
रोप ते करूं या सर्वांअधीं॥
मनासारखे भाताचें हें रोपहि आलें जरी॥
पाहिजे पाऊस सरिंवर सरी ॥

किती ऊन कडकतरि पडलें पहा॥
सुकलीं कीं सर्वांची तोंडें अहा!॥
कधिं कोसळेल समजेना मेघ हा॥

आली आली मुसळधार ही, देव पावला भला!॥
रोप तें सत्वर उपटू चला ॥१॥

गुडघ्यावेरीं ते चिखल जाहला आतां करूं लावणी॥
संपवूं काम गीत गाउनी॥
चोंढे तैशीं सर्व खाचरें तुडुंब भरलीं जळें॥
दिसतसे पीक सर्व लाभलें॥
आनंदानें पाहूं आतां पुनव नव्याची बरी॥
प्रभुकृपेस्तव या संवत्सरीं॥

काय मजातरि या शिवाराचि दीसते॥
ठायिं ठायिं जलाचे ओघ वाहताति ते॥
सुखावले पशुपक्ष्यादिक सारे जीव ते॥

झालि दिवाळी हळुहळु आतां शेतकापणिस चला II
सुगीचा लाभ बरा जाहला॥२॥

                   कवी - "अनामिक"
                 ------------------

     (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
    ----------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.08.2021-शनिवार.