II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II-(लेख क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 12:29:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                II स्वातंत्र्यदिनाच्या 2021 हार्दिक शुभेच्छा.II
               -----------------------------------------
                               (लेख क्रमांक-१)
                              ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज १५, ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी भावांस आणि कवयित्री भगिनींस, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाचूया, १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाची माहिती आणि महती.

     15 ऑगस्ट,  स्वातंत्र्य दिन हा भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी एक विशेष दिवस आहे. या दिवशी, ध्वज रोवून अनेक लोक तिरंगा गौरवा करतात. या दिवशी, भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जातात आणि द्वारपाल देतात.    १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडातून भारत मुक्त झाला. आपले स्वत:चे संघ राज्य निर्माण झाले. जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. १५० वर्षे आपण अनंत यातना हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशी दिली गेली. कित्येकाना तुरुंगवास भोगावा लागला. १८५७ पासून आपण ब्रिटीश राजवटी विरुद्ध युद्ध करीत होतो. लाखो राष्ट्रभक्तांना युद्धाच्या यज्ञ कुंडात प्राणांची आहुती द्यावी लागली. कित्येक संसार नष्ट झाले. इतक्या लोकांच्या बलिदानामुळे भारत हा सोनियाचा दिवस पाहू शकला. यूनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला. किती रोमहर्षक क्षण असेल तो! त्या दिवसाची आठवण आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा स्वातंत्र्या दिन साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले .त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोक प्रतिनिधी कारभार करणार होते. आता कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा! हे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघराज्याची घटना लिहिली. त्याप्रमाणे आपले कायदेकानून आपण बनविले.

     धर्मनिरपेक्ष राष्ट्र :-- १५ ऑगस्टच्या पूर्व संध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये आम्ही काय सुधारणा केल्या आहेत आणि काय करणार आहोत हे राष्ट्राला कळवतात. दुसर्या दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहण होते. राष्ट्रगीत होऊन प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली वाहतात आणि नंतर प्रमुख पाहुण्यासहित कार्यक्रमाला जातात. त्या दिवशी दिल्लीत म्हणजे आपली राजधानीत तसेच सर्व शाळांमध्ये व कॉलेजामध्ये नाच गाणी व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. लहान मुलांना झेंडे घेऊन नाचत फिरताना पाहून खूप मजा वाटते. सगळी कडे झेंडा वंदनाचे कार्यक्रम होतात.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.