II पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा II-"पारसी नवं-वर्ष"-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 08:06:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "पारसी नवं-वर्ष"
                      II पतेतीच्या हार्दिक शुभेच्छा II
                             लेख क्रमांक-3
                    -------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज या सोमवारच्या दिनी १६.०८.२०२१ ,साल २०२१ चे पारसी नवं वर्ष सुरु होत आहे. माझ्या सर्व पारसी बंधू आणि भगिनींना या पारसी नवं-वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . ऐकुया माहिती पूर्ण लेख.


                पारसी समुदायाची ओळख:-----
              --------------------------

     पारसी लोकांचे पूर्वज प्राचीन इराणी लोक हे इंडो-युरोपिअन भाषिक समूहाच्या इंडो-इराणीयन शाखेचा एक भाग होते आणि प्राचीन इंडो-आर्यन (वैदिक आर्य) लोकांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता.पारसी लोक हे सामान्यत: उंच, गोरे, बळकट बांध्याचे, मोठे कपाळ, सरळ व मोठे नाक, मोठे डोळे असे दिसतात.

                          पारसी खाना:-----
                         -------------

     पारशी लोकांचे पदार्थ आवडीने हॉटेल्स मधून खाल्ले जातात. पारसी खान्यात मुख्य भात आणि घट्ट डाळीचा समावेश आहे. पारशी लोकं मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात.

                         पारशी विवाह:-----
                        -------------

     पारश्यांसाठी विवाह संस्था अतिशय महत्त्वाची असून लग्न गाठी देवानेच बांधलेल्या असतात असा त्यांचा समज आहे. विवाहासाठीचा त्यांचा पारशी लग्न आणि फारकतीचा कायदा आहे. विवाहाच्या आधी दोन्ही घरात दिवे लावले जातात. त्यांनंतर दोन्हीकडचे व्याही एकमेकांना भेटायला जातात तेव्हा चांदीची नाणी शकून म्हणून देतात. विवाहचा पोशाख पांढरा असून, विधी दरम्यान कूंकू लावणे, मांग  भरणे, अक्षदा आणि ओटी भरणे प्रथा आहेत.

                      पारशी अंत्यविधी:-----
                     ----------------

    पारशी अंत्यविधी इतर धर्मांपेक्षा वेगळा असल्यामुळे कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्यात मृतदेहाचा संपूर्ण नाश स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाते. एखादी व्यक्ती मृत झाल्यावर तिला स्पर्श करण्यास बाकीच्यांना मनाई करण्यात येते. मृतदेहाला स्नान घालून पांढरे वस्त्र परिधान करण्यात येते. पारंपारिक धार्मिक मंत्र म्हणून झाल्यावर मृतदेहाला पारशी स्मशान किंवा विहीरीपाशी नेण्यात येते. तेथे मृतदेहाचे संपूर्ण वस्त्र काढण्यात येतात व मृतदेहाला पक्षी व प्राण्यांनी भक्षण करण्याकरिता सोडून देण्यात येते. घर संपूर्ण गोमूत्राने साफ करुन, पवित्र धूप, दिप लावला जातो व मृतातम्यास शांती वाहिली जाते.

                        खोरदाद साल:-----
                      ---------------

    खोरदाद हा दिवस पारशांचा देव झोरोस्टार ह्यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस नवरोज (पतेती) नंतर सहाव्या दिवशी साजरा केला जातो. ह्या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाऊन त्यांच्या दैवताची प्रार्थना करतात. त्या दिवशी घराघरात गोड पदार्थ केले जातात. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. ' चांगले विचार, आचार आणि सतकर्म ' हा ह्या पवित्र दिवसाचा संदेश आहे.

   
      पारसी नववर्ष नवरोझच्या शुभेच्छा !!!


                  (संकलक-भरत वटाणे)
                 ---------------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-सूत्रसंचालन .कॉम)
            ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.