भाव-गीत - ।। अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ।।

Started by Atul Kaviraje, August 16, 2021, 08:56:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  ऐकुया एक भाव-गीत. या गीताचे गीतकार आहेत श्री मंगेश पाडगावकर, आणि याला स्वर दिला आहे श्री अरुण दाते यांनी. या भाव-गीताचे बोल आहेत-"अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी"

 
                                    भाव-गीत
                    ।। अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी  ।। 
                   -----------------------------------------


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी,
लाख चूका असतील केल्या केली पण प्रीती.

इथे सुरु होण्या आधी संपते  कहाणी
साक्षिला केवळ  उरते डोळ्यांतील पाणी,
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाणी.

सर्व बांधा तोडुनी जेव्हा नदी  धुंद धावे
मिलन व मरण पुढे हे तिला नसे ठावे,
एकदाच आभाळाला अशी भिडे माती.

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे,
तरी गंध धुंदीत धावे जीव तुझ्यासाठी.

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गुंज अंतरीचे कथिलें तुला या स्वरांनी,
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती.


          ===================
              । गीतकार :   मंगेश पाडगांवकर । 
              ।  गायक :    अरुण दाते ।
              । संगीतकार : यशवंत देव ।
              । गीतप्रकार : भावगीत ।
          ===================


                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आठवणीतील गाणी.कॉम)
               -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.08.2021-सोमवार.