गंभीर वास्तव चारोळ्या-" कणखर देशा, दगडांच्या देशा, पण आता दरडींच्या देशा !"

Started by Atul Kaviraje, August 19, 2021, 03:17:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                विषय : गावोगावी कोसळणाऱ्या दरडी
                          गंभीर वास्तव चारोळ्या
      " कणखर देशा, दगडांच्या देशा, पण आता दरडींच्या देशा !"
                               (भाग-१)
     -------------------------------------------------------


(१)
"कणखर देशा, दगडांच्या देशा"
चित्र पालटले, काव्य बदलले
धडाधड कोसळणाऱ्या "दरडींच्या देशा,"
तरीही आहे महाराष्ट्र माझा !

(२)
सर्वस्वच हरवून, हिरावून बसलाय
आघात पचवून उभा राहिलाय
"कड्याप्रमाणेच ताठ कणा" असणाऱ्या,
"मराठी माणसाचा बाणा" पाहिलाय.

(३)
"दरडी" कोसळताहेत, निज नाही
पापण्यांच्या "कडा" भरून वाही
हाता तोंडाची गाठ पडेल ?
सारी रात्र जागून राही !

(४)
तो होता "अति-वृष्टीचा महापूर"
आज कोसळतोय "दरडींचा दगड-पूर"
संकटे येती, चोहोबाजूनी ग्रासती,
स्वप्नांचे गाव राहिलं दूर !

(५)
पाऊले चालतात निरंतर अथक
थांबायचे नाही, याच प्राण-भयाने
"सर सलामत तो पगडी पचास,"
दूरवरल्या डोंगरास वेढलंय धुक्याने.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.08.2021-गुरुवार.