कर्तव्य-दक्ष स्त्री चारोळ्या - "चहा टपरीवरील विक्रेत्या मुलीचे मनोगत"

Started by Atul Kaviraje, August 21, 2021, 02:19:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                         कर्तव्य-दक्ष स्त्री चारोळ्या
              "चहा टपरीवरील विक्रेत्या मुलीचे मनोगत"
                               (भाग-2)
             -------------------------------------


(७)
काहींच्या नजरेत प्रश्न असतो
ही स्त्री असून स्टोल चालवते ?
तर काहींच्या डोळ्यांत असते प्रशंसा,
कर्तव्य-दक्ष दिसतेय, काहीतरी करून दाखवते.

(८)
सर्व-धर्मियांचे येणे असते माझ्या स्टोलवर
सुख-दुःख देवाण-घेवाण,होते चर्चा घटकाभर
आपुलकी दाखविताच, मायेने जवळ येतात,
एक नाते असल्यासारखे विचारपूस करतात.

(९)
चांगल्या गोष्टी मिळाल्यात अनुभवायला
बरच काही मिळालय ग्राहकांकडून शिकायला
आज बाबा खूष आहेत माझ्यावर,
आनंदास नाही राहिलाय त्यांच्या पारावर.

(१०)
ऐन अडचणीत मुली तू घर संभाळलेस
कुटुंबाला पुन्हा नव्याने एकत्र जोडलेस
मी म्हणाले, माझेही आहे काही कर्तव्य,
दाखवावे काही करून आपल्यांसाठी दिव्य.

(११)
अशी बरीचशी कुटुंबे अडचणीत आहेत
दोन वेळच्या अन्नासाठी झगडत आहेत
कोरोनाने घेतलाय घास त्यांचा हिरावून,
डोळ्यांत पाणी येते टचकन, हाल त्यांचे पाहून.

(१२)
माझे मत, हताश होऊ नका तुम्ही परिस्थितीने
हात-पाय नका गाळू, असहाय्यतेने
खंबीर व्हा,धीर धरा,मेहनत करा,काम करा,
आपल्यांचे होऊन,आपल्यांसाठी काहीतरी करा.

(१३)
कोणत्याही कामाची तयारी ठेवा
कोणतेही काम नाहीय कमी किंवा लहान
एकत्र होऊन, एकत्र येऊन संकटे सारी झेलूया,
या मोठ्या संकटालाही कसोशीने मात देऊया.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2021-शनिवार.