म्हणी - "आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे"

Started by Atul Kaviraje, August 21, 2021, 11:24:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे"


                                      म्हणी
                                  क्रमांक - 18
                 "आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे"
                 -------------------------------------------


18. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
     -------------------------------------------

--अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
--एखाद्या आंधळ्या माणसावर देव प्रसन्न झाल्यावर देवाने त्याच्या इच्छेवरून त्याला अर्दन म्हणून एक डोळा न देता दोन डोळे दिले तर त्याला किती आनंद होईल ? अचानकपणे अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं तर आनंद गगनात मावणार नाही .
--अपेक्षेहून जास्त मिळणे .
--अपेक्षा केली त्यापेक्षा जास्त मिळणे.
--अपेक्षा धरावी त्याहून जास्त लाभ होणे.
--अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त  होणे.
--आंधळ्यास एक डोळ्यानें दिसूं लागलें तरी त्याचा कार्यभाग होऊं शकतो. मग त्याच्या दोन्ही डोळ्यांस दृष्टि आली तर त्यास विशेष आनंद होईल यांत नवल काय ? तसेंच केव्हां केव्हां आपल्या अपेक्षेपेक्षांहि अधिक आपल्याला एखाद्या कार्यांत लाभ होतो तेव्हां आपणांस फारच आनंद होतो, अशा वेळीं ही म्हण योजतात.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ---------------------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2021-शनिवार.