खसखस पिकव्या मोबाईली चारोळ्या- " रेल्वे डब्यात झालीय मोबाईलची वस्ती "

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 02:08:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     खसखस पिकव्या मोबाईली चारोळ्या
                   " रेल्वे डब्यात झालीय मोबाईलची वस्ती "
                                   (भाग-२)
                 -------------------------------------


६)  मोबाईलच्या कौलर ट्यून अथक वाजताहेत
     गाडीच्या आवाजालाही पाठी टाकताहेत
    आवाजाचे प्रदूषण प्रमाण वाढलंय भरमसाट,
    गाडीचा भोंगा आज पडलाय धूळ खात.

७)  एकमेकांच्या समोर बसलेत सख्खे सख्खे भाऊ
      त्यांना घरी प्रत्यक्ष बोलण्यास नाहीय वेळ
     मोबाईलवर संपर्क साधताहेत मगापासून,
     अहो, हा सारा तर मोबाईलचाच खेळ.

८)  हाती मोबाईल, कानी ऐकण्याची दोरी
     गाणी ऐकण्यात आहे मग्न मी
     मला का असेल बाहेरच्यांची पर्वा ?
     गाडीमध्येच मी तालावर डोलवू लागलोय सर्वां !

९)  कुणाचे कुणाकडेही नाहीय लक्ष्य
     शेजारी बसूनही नाहीय बोलणे-चालणे
     मोबाईलने तोडलाय दुवा माणसांचा,
     जो-तो गुलामच झालाय मोबाईलचा.

१०) ऐका सर्व-सामान्यांची करुण कहाणी
     अन इवलुश्या, चिमुकल्या मोबाईलची करणी
     मानवाच्या साऱ्या हालचालींना बांधून ठेवलयं,
     मोबाईलने त्यांना चक्क अपंगच केलयं.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.