म्हणी - "अति शहाणा त्याचा बैल रिकामा"

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 01:00:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "अति शहाणा त्याचा बैल रिकामा"

                                     म्हणी
                                 क्रमांक -19
                     "अति शहाणा त्याचा बैल रिकामा"
                   --------------------------------


19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
     -----------------------------

--जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
--एखादा माणूस स्वतःच्याच बढाया मारत असेल किंवा स्वतःच स्वतःचे गोडवे गात असेल , तर जवळपासच्या व्यक्ती त्याच्यापासून चार हात लांबच राहतात . गावात नांगरणीसाठी किंवा प्रजननासाठी बैल मागण्याची जुनी पद्धत आहे पण स्वतः स्वतःची कौतुकं करण्याची सवय असेलेल्या माणसाकडे कोणीही मदतीसाठी किंवा कामासाठी संपर्क करत नाहीत .
--एखाद्या बाबतीत अति शहाणपणा दाखवायला गेल्यास आपलंच नुकसान होतं. त्यामुळे कधीही एखादी गोष्ट नीट समजवून घ्यावी. त्याबद्दल इतरांचं मत घ्यावं आणि मग करावी. घाई करू नये.
--शिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते.
--जो मनुष्य फार शहाणपणा करतो,त्याच्याकडून कोणतेही उपयॊगी किंवा मोठे काम होत नाही .
-- प्रत्येक कामामध्ये जास्त चिकित्सा व अति करत बसल्यास कोणतेही काम पूर्ण होत नाही.
--जो व्यक्ती अति शहाणपणा दाखवतो त्याचे काम मुळीच होत नसते.
--अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो.
--जो मनुष्य फार शहाणपणा करतो, त्याचे कार्य अधुरेच रहाते.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ----------------------------------------------

                                कथा क्रमांक-१--
                               ---------------

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.
ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यात खूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली.
मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडू लागला. डब्यातले सगळे लोक भीतीने खाली उतरले.
हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्या एका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.
जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली. तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं,
"कोणतं स्टेशन आलं हो ?"
माणूस म्हणाला, "पुणे स्टेशन."
"काय? पुणे स्टेशन?",
तो तरुण गोधळून म्हणाला.
"होय, या डब्यात साप होता, म्हणून गाडी हा डबा इथेच सोडून सोलापूरला गेली,"

     तात्पर्य : अती शहाणा त्याचा बैल रिकामा...-जो वाजवीपेक्षां जास्त हुषारी दाखविण्याचा प्रयत्न करतो त्याचें मुळींच काम होत नाहीं. फाजील शहाणपणा नुकसानच करतो. एक माणूस आपण बैलाकडून काम करुन घेतलें तर त्याला फार खावयाला घालावें लागेल व मग नुकसान येईल म्हणून त्याला रिकामा ठेवी. या मूर्खपणाबद्दल त्याचें दुप्पट नुकसान झालें. कारण त्याचें मुळींच काम न होतां बैल मात्र पोसावा लागला.

                                  कथा क्रमांक-2--
                                ----------------

दरबारात एकदा बिरबल आणि बादशहात वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला.
असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक दरबारी त्याला म्हणाला – बिरबलजी, महाराज आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रीपद काढुन घेतील आणि तुम्हाला कुत्तेवान म्हणजेच कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमतील.
बिरबल – साहेब महाराजानी जरी मला कुत्र्यावरचा अधिकारी नेमले तरी त्यात मला आनंदच वाटेल. कारण तुम्हाला मग माझ्याच आज्ञेत राहावं लागेल.बिरबलाने आपल्याला कुत्र्याच्या रांगेत बसविल्याचे पाहून सरदार दात-ओठ खात निघून गेला.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.