II रक्षा बंधन शुभेच्छा II - निबंध (क्रमांक - १)

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 06:42:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                    निबंध (क्रमांक - १)
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनानिमित्त  माहितीपर निबंध.


                       " रक्षाबंधन " मराठी निबंध (क्रमांक - १)
                     ---------------------------------------

                              प्रस्तावना :-----
                            ------------

     भारतीय संस्कृतीमध्ये सण, परंपरा यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. येथील अनेक सण साजरे केले जातात. भारत देशामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात.

     प्रत्येक जातीचे, धर्माचे सण येथे साजरे करतात. प्रत्येक सणा मधून एक विशिष्ट संदेश सुद्धा दिला जातो. तसेच बहिण भावाचे नाते दर्शविणाऱ्या त्यांच्यातील प्रेमसंबंध दाखविणारा सण म्हणजे " रक्षाबंधन" आणि आज आपण निबंध बघणार आहोत ते म्हणजे याच सणावर " रक्षाबंधन".

      रक्षाबंधन हा सण भारत देशामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देशातील विविध जातीचे, धर्माचे लोक एकत्र येऊन अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतात.

                         रक्षाबंधन म्हणजे काय :-----
                        ----------------------

      "रक्षाबंधन" म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे बंधन त्यांच्या मायेचे बंधन. दोघांमध्ये असलेल्या स्नेहाच्या नात्याचे बंधन म्हणजे रक्षाबंधन होय.

     तसेच रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात, राखी म्हणजेच बहिण- भावाच्या प्रेमाला दर्शविणारे प्रतीक आणि त्यांच्या अनमोल नात्याची रेशमी धाग्यातून बांधलेली गाठ अशा अनमोल राखीला रक्षाबंधन या दिवशी अनन्य साधारण महत्व आहे.

                       रक्षाबंधन हा सण केव्हा येतो :-----
                     -----------------------------

     रक्षाबंधन हा सण हिंदू कालगणनेनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये व मराठी कालगणनेनुसार श्रावण महिन्या मध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये काय भागामध्ये रक्षाबंधन म्हणून ओळखला जाणारा हा सण पश्चिम भारतात   "नारळी पौर्णिमा" म्हणून ओळखला जातो व साजराही केला जातो.

                    रक्षाबंधन सणाची तयारी कशी करतात :-----
                   -------------------------------------

     बहिण- भावाचे सुंदर नाते दर्शविणारा हा सणाच्या दिवशी पहाटे लवकर उठून बहिण भाऊ अंघोळ करून नवीन आणि सुंदर कपडे घालतात. सकाळच्या शुभ मुहूर्तावर बहिण आपल्या भावाला पाठीवर बसून डोक्यावर स्वच्छ आणि नवीन रुमाल घालून, कपाळावर कुंकवाचा टिळा लावते व त्यावर तांदळाचे दाणे चिटकवते.

     व बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखीचा पवित्र धागा बांधल्यावर भावाच्या मुखामध्ये काहीतरी गोड मिठाई ठेवते. तसेच बहिण आपल्या भावाला ओवाळते आणि आपल्या भावाच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करते.

     तसेच ओवाळणी झाल्यावर भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे चा आहेर आशीर्वाद म्हणून ओवाळणीच्या ताटात ठेवतो व बहिणीच्या पाया सुद्धा पडतो.

     व दोघे बहिण- भाऊ एकमेकांना वचन देतात की, भाऊ हा कुठल्याही परिस्थितीमध्ये व समस्यांमध्ये सदैव आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा राहील.

     व बहिण सुद्धा काही समस्या असल्यास आपल्या भावाकडे च त्याचे समाधान करेल. या दिवशी काही ठिकाणी, भागात बहिण- भाऊ राखी बांधण्यापूर्वी उपवास ठेवतात आणि राखी बांधून झाल्यानंतर दोघं मिळून उपवास सोडतात.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमित्र .इन)
                ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.