II रक्षा बंधन शुभेच्छा II - निबंध (क्रमांक - 2)

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 07:58:40 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                    निबंध (क्रमांक - 2)
                                 -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनानिमित्त  माहितीपर निबंध


                       " रक्षाबंधन " मराठी निबंध (क्रमांक - 2)
                      --------------------------------------

                            रक्षाबंधन सणाचे महत्व :-----
                          ------------------------

     राखी चा दोरा हा नुसता दोराच नसून तो बहिण- भावाच्या नात्याचे प्रतिक आहे. ते एक शील, प्रेमळ, मायाच्या पवित्र्याचे रक्षण करणारे बंधन आहे. हा दिसायला छोटासा दिसणाऱ्या धाग्या सोबत अनेक जणांची पवित्र मने जुळलेली असतात.

     त्यांच्या भावनांचा आदर करणारा व पिढ्या न पिढ्या बहिण- भावाचे नाते टिकवून ठेवणारा हा रक्षाबंधन सण भारत देशा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात साजरा केला जात नाही.

                          रक्षाबंधनची पौराणिक कथा :-----
                         ---------------------------

     रक्षाबंधन हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो व हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सुद्धा आहेत. काही जण असे म्हणतात की, जेव्हा श्री कृष्णांची काही कारणाने राग भरात येऊन आपले सुदर्शन चक्र सोडून स्वतःच्या चुलत भावाला वध केला तेव्हा व त्यांच्या उजव्या हाताला जखम होऊन रक्त येऊ लागले.

     मग हाताला काहीतरी कापड बांधण्यासाठी इकडे- तिकडे शोधू लागले तेव्हा पाच पांडवांची पत्नी द्रौपदीने स्वतःच्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णांच्या हाताला जखम झालेल्या भागावर बांधली तेव्हा श्रीकृष्णांनी द्रोपदीचे रक्षण करण्याचे वचन घेतले व एक भाऊ म्हणून द्रौपदीच्या सदैव पाठीशी उभा राहण्याचा संकल्प केला.

     तसेच जेव्हा देवी इंद्राचा पराजित दानवांकडून झाला तेव्हा इंद्राणीने इंद्राच्या उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले त्यामुळे इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला व त्यांना युद्ध करण्यास प्रोत्साहन मिळून त्यांनी दानवांना हरवून विजय प्राप्त केला. व तेव्हा पासून रक्षाबंधन सणाला सुरुवात झाली असा समज आहे.

     तसेच राणी लक्ष्मीबाई यांनी लढण्यासाठी नवाब बांदा यांना राखी भेट वस्तू पाठवून मदत करावी अशी विनंती केली. अशा प्रकारे अनेक प्राचीन व पौराणिक कथांमधून सुद्धा बहिण- भावाच्या नात्यां बद्दल असलेला प्रेमळ भाव बघायला मिळतो.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमित्र .इन)
                  ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.