चष्म्यावर खुशखुशीत विनोदी चारोळ्या - "चष्म्याचा धंदा जोरात चाललाय"

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 02:27:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  चष्म्यावर खुशखुशीत विनोदी चारोळ्या
                     "चष्म्याचा धंदा जोरात चाललाय"
                                 (भाग -२)
                -----------------------------------


(६)
चष्म्याचे घाऊक व्यापारी,नाव होतंय सर्वत्र
लांबून लांबून लोक येति, जमती सारी एकत्र
माझ्यावर त्यांचा विश्वास आहे खरा,
म्हणती, नवीन दृष्टी दे आम्हा, हे दृष्टीच्या जादूगारा.

(७)
डे-नाईट दुकान माझे,केमिस्ट सारखेच
चष्मा घेण्यास लोक येति, एक-सारखेच
मी आता एक अद्ययावत ऑफिसही थाटलंय, सोबत,
इन्कम-टॅक्स भरतोय वर्षाकाठी अगदी न चुकत.

(८)
नशिबाचे फेरे पालटले पहाता-पहाता
बरकत आलीय धंद्यास काल, आज आणि आता
यापाठी आहे मोबाईलचे खरेखुरे योगदान,
जाणवतंय नक्कीच, मूर्ती लहान पण कीर्ती आहे महान.

(९)
दुकानाच्या ठिकठिकाणी शाखा उघडल्यात
मोबाईलच्या गॅलऱ्या मी पुरेपूर हेरल्यात
थाटून शेजारीच त्यांच्या, अद्ययावत धंदा,
बक्कळ झालाय पैसा, खाती फुगलीत यंदा.

(१०)
जोवर मोबाईलचा आहे सर्वत्र खप
जोवर मोबाईलला आहे मार्केट खूप
व्यक्तिमत्त्वातही होऊन बदल कायमचा,
माझ्या घराचेही सारे पालटलेय रूप.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.