म्हणी - "आधी शिदोरी मग जेजूरी"

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 12:10:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आधी शिदोरी मग जेजूरी"

                                     म्हणी
                                 क्रमांक -20
                          "आधी शिदोरी मग जेजूरी"
                        --------------------------


20. आधी शिदोरी मग जेजूरी
     -----------------------

--आधी भोजन मग देवपूजा.
-- प्रत्येकाने आधी आपापल्या कुटुंबासाठी , चरितार्थासाठी पैसे कमवायला हवे .आपल्या घरातील /जवळच्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून मगच तीर्थयात्रा किंवा बाहेर देवदर्शनासाठी वेळ द्यावा .
--आधी स्वतःचे भोजन मग देवधर्म.
--पहिले जेवण मग देवपूजा.
--जेजुरीस जाऊन खंडोबाचे म्हणजे देवाचे दर्शन घ्यावयास जावयाचें तर किंवा प्रवासास निघावयाचे तर प्रथम शिदोरीची तजवीज केली पाहिजे. तिची तरतूद केल्याशिवाय अपेक्षित स्थळी पोचणें शक्य नाही. कोणतेहि कार्य करावयाचे झाल्यास त्यास लागणारी सर्व साधनें प्रथम सिद्ध केली पाहिजेत. तु०-आधी पोटोबा मग विठोबा.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  -------------------------------------------

                            उदाहरण:--
                           ---------

      एक कुटुंब आता जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला निघालयं आणि त्या घरातली माऊली सगळ्यांना समजावून सांगत्ये त्या देवदर्शनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक तरतूद. या चार शब्दांच्या वाक्यात माऊली सांगते, शेतीची सर्व कामे नीट पूर्ण करा. घर आवरा . प्रवासातील सामान बांधा. प्रवास खर्चाची तजवीज करा. शेजाऱ्यांचा निरोप घ्या आणि सरते शेवटी प्रवासात लागणारी शिदोरी तिची तयारी करा. 'शिदोरी' या एका शब्दांत सामावलेला असा सूक्ष्म अर्थ, मौखिक परंपरेने कुटुंबातील स्त्रियांच्या माध्यमातून एका पिढीतून पुढच्या पिढीकडे प्रसारित होत राहिला. समर्थ रामदासांनी सांगितलेल्या प्रपंच विज्ञानातील हा एक उत्तम धडा. आता आपणास पटेल या लोकश्रुती म्हणजे निखळ विज्ञान, बुद्धिमत्ता, तत्वज्ञानाचे miniature म्हणजे सूक्ष्म सल्ले.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.