II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II-शुभेच्छापर संदेश-भाग-२

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 12:15:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          II श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा II
                           II श्रावण सोमवार शुभेच्छा-२०२१ II 
                                         (भाग-२)
                         ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

    श्रावण मासाची सुरुवात 9 ऑगस्टपासून झाली आहे. सर्व सणांचा राजा अशी या श्रावण महिन्याची ओळख आहे. मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी बांधव आणि कवयित्री भगिनींस, माझ्याकडून श्रावणाच्या  हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ते, काही शुभेच्छापर संदेश, कोट्स, स्टेट्स इत्यादी.

     श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने पुण्य मिळते असे समजण्यात येते. यंदा 26 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार येत आहे. श्रावण सोमवारचे व्रत अनेक महिला करतात. भगवान शिव यांच्या आवडीचा हा महिना समजण्यात येतो. त्यामुळे या सोमवारी व्रत करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेता येते अशीही गाथा सांगण्यात येते. अशा या पवित्र श्रावण सोमवार शुभेच्छा मराठीत  खास तुमच्यासाठी.

                🌳श्रावण महिना शुभेच्छा मराठी 🌳:-----
               ---------------------------------

1. शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे,
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती.
     श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

2. पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा,
     भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

3. ओम नमः शिवाय – बम बम भोले,
     श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4. महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान,
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना.
     श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

5. श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत,
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण.
     श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
               -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.