‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "आणि येतो पावसाळा"

Started by Atul Kaviraje, August 25, 2021, 12:20:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे पंधरावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " ग. दि. माडगूळकर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"आणि येतो पावसाळा"


                                   कविता पुष्प-पंधरावे
                                 "आणि येतो पावसाळा"
                                 --------------------


...आणि येतो पावसाळा



ग. दि. माडगूळकर  म्हणजे शब्दप्रभू. केवळ पाच कडव्यांत जलचक्र समजावून दिलेली त्यांची सुरेख कविता आज 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये पाहू या.


नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर,
अशी शहाण्यांची म्हण,
नाही नदीला माहेर.

काय सांगू रे बाप्पांनो
तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराला जाते,
म्हणुनीच जग चाले.

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो,
जन्म दिलेला डोंगर.

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते,
पंख वाऱ्याचे लावून.

पुन्हा होऊन लेकरू
नदी वाजाविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा,
आणि येतो पावसाळा.


                कवी- ग. दि. माडगूळकर
               ------------------------


  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' 
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.08.2021-बुधवार.