बचके रहना रे बाबा..

Started by gaurig, March 24, 2010, 09:03:10 AM

Previous topic - Next topic

gaurig

बचके रहना रे बाबा..         
                                                   अमेय गिरोल्ला - मंगळवार, २३ मार्च २०१०
                                     रूपारेल महाविद्यालय'

एझिंग्या.. शुक शुक.. अरे इकडे बघ ना.. अरे ए, इकडे इकडे..'
'अरे नंतर सांगतो.. मला तर लिहू दे आधी'
'अरे तुला उत्तर कोण विचारतंय.. इतके वाईट दिवस आलेत का माझ्यावर!!! अरे फक्त 'यू'चं स्पेलिंग सांग ना..'
'आता 'यू'चं कसलं आलंय स्पेलिंग? काय वेडय़ासारखं विचारतोयस? 'यू'चं स्पेलिंग 'यू'चं'..
'अरे गप रे.. अरे त्या एसएमएस, ऑर्कुटच्या नादात स्पेलिंगस्च आठवत नाहीयेत.. 'यू'चं स्पेलिंग काहीतरी वेगळंच आहे रे.. ए बोक्या 'यू'चं स्पेलिंग काय रे? त्या 'तू' वाल्या 'यू'चं? '
'शूऽऽऽ हळू बोल ना.. वायओयू..'
'अरे हो.. आत्ता आठवलं.. माहीत होतं रे मला.. जस्ट कन्फर्म करत होतो. तू लिही लिही तुझा पेपर.. टेन्शन नको घेऊस.. अपून है ना.. बिनधास्त..'
हसायला येत असेल ना? इतरांचीही आपल्यासारखीच अवस्था होत असेल तर सर्वसामान्य म्हणजेच नॉर्मल माणसाला हसायला येतंच. त्यात काहीच गैर नाही. परीक्षा चालू झाल्या आहेत आणि अभ्यासाची तर आधीच बोंब. पुन्हा जी उत्तरे येत आहेत, त्यातले स्पेलिंगस् आठवली नाहीत तर डोक्याला शॉटच. गेल्या परीक्षेच्या वेळचा किस्सा अजूनही आठवतोय. शेवटचा पेपर सुटल्यानंतर आपला केयूर मोठय़ा ऐटीत वर्गाबाहेर पडला होता. कॅन्टीनमध्ये खुलेआम घोषणा झालेली.. 'बॉस, यावेळी आपण एकदम झक्कास पेपर लिहिलाय. ७० टक्के मिळवण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही.' त्याची ती प्रतिक्रिया आणि आत्मविश्वास पाहून इतर विद्यार्थ्यांनाही ते खरंच वाटलं होतं. काही दिवसांनी पेपर मिळाले. ७० टक्के दूरचीच गोष्ट.. पण केयूरला सरांनी पास केले होते हीच मोठी मेहेरबानी झाली होती. नेहमी लहानसहान गोष्टींवरून प्राध्यापकांशी जाहीर वाद घालणाऱ्या केयूरला यावेळी काही बोलण्याचा चान्स पण नव्हता. त्याचा संपूर्ण पेपर लाल शेऱ्यांनी भरला होता. उत्तरं बरोबर होती. पण केयूरच्या माध्यमातून एका नवीनच शब्दकोशाचा शोध लागलेले त्याचे प्राध्यापक मात्र भंडावून गेले होते.  d 1st world war ws 4 dimensional war wich ws fought on d c as wel... हे इतिहासाच्या पेपरमधील वाक्य. आता ज्याला dimensional चं स्पेलिंग येते, त्याला the, was, four, which, sea, well   यांचं स्पेलिंग माहीत असायला काहीच हरकत नसावी ना! पण ते सवयीचे गुलाम म्हणतात ना, तेच केयूरच्या ७० टक्क्यांचा आड आलं होतं. एसएमएस, ऑर्कुट, फेसबुकच्या या 'स्वीट अ‍ॅन्ड शॉर्ट' लॅंग्वेजने त्याचा घात केला होता. याशिवाय  thnx, wud, wid, gud, ur, tk, wen, der  अशा अनेक नवनवीन स्पेलिंगज्नी केयूरच्या प्राध्यापकांना बुचकळ्यात टाकलं होतं. कधी नव्हे ते, संपूर्ण वर्गाला प्रथमच कोणाची तरी उत्तरपत्रिका यानिमित्ताने पाहायला मिळाली होती.. आणि काही विद्यार्थ्यांच्या  'खरंच आपले पेपर तपासले जातात का रे?' या प्रश्नाचेही उत्तर यानिमित्ताने मिळून गेले होते.
केयूर सारखीच अवस्था आज प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज आपली तरुण पिढी मराठी भाषेची वाट लावतेय हे आपण वरच्यावर ऐकतो. पण इंग्रजीचीही विल्हेवाट लावण्यात आपण कसलीच कसर ठेवली नाहीये हेही तितकंच खरं! अर्थात यात भूषणावह असं काहीच नाहीये. एसएमएसच्या माध्यमातून लागलेली ही शॉर्ट लॅंग्वेजची कीड आज अनेकांना महागात पडत असून परीक्षेत अजाणतेपणाने, सर्रास या शॉर्ट स्पेलिंगचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरी परीक्षा तर पेपर तपासणाऱ्या  प्राध्यापकांनाच द्यावी लागतेय. महाविद्यालयीन तरूणांनी जणू काही कागदाची बचत करण्याचा संकल्पच केल्याने जागोजागी हे नवे छोटे शब्द प्राध्यापकांना दिसून येत आहेत. मुलांनी अक्षरश: प्रत्येक इंग्रजी अल्फाबेटचा एक शब्द बनवून टाकल्याची तक्रार अनेक प्राध्यापक करताना दिसतात. be साठी b, see साठी  c, the साठी ,d, are साठी r, you साठी u, we साठी v आणि why साठी निव्वळ y  अशी नवीकोरी डिक्शनरी विद्यार्थी या परीक्षेत सादर करतात. त्याशिवाय college, because अशा अनेक सहा-सात अक्षरी शब्दांसाठी सुद्धा या विद्यार्थ्यांनी clg, bcoz हे शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट दोन-तीन अक्षरी शॉर्टफॉर्मस् शोधून काढले आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, हे शब्द विद्यार्थ्यांच्या इतके अंगवळणी पडले आहेत, की त्यांचं काही चुकतंय हेच मुळी त्यांच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे निकाल हाती पडल्यावर आपल्याला कमी गुण का मिळाले असे प्रश्नार्थक चेहरे घेऊन विद्यार्थी पुनर्तपासणीसाठी सुद्धा जाता ना दिसतात. काही विद्यार्थी तर या शब्दांना काहीच हरकत नसावी अशाही मताचे आहेत. 'काळानुसार भाषा बदलत जाते, मग हे नवे बदल स्वीकारायला काय हरकत आहे?' हा त्यांचा प्रतिप्रश्न. तर अनेकांची अवस्था मात्र 'कळतंय पण वळत नाही' अशी झाली आहे.
कारण वर्षभरात थोडय़ाफार प्रमाणात ज्या नोटस् वगैरे लिहिल्या जातात, त्यावेळेसही चालून जातंय म्हणून हीच भाषा वापरली जाते. दिवसभरात एसएमएस, चॅटिंग करताना तर ही भाषा वापरणं मस्टच असतं. पुन्हा यामुळे कामही पटपट होतंय अशी विद्यार्थ्यांची धारणा असते. मग सहाजिकच त्याचे प्रतिबिंब परीक्षेत उमटते. कितीही ठरवलं तरीही तो हात your  ऐवजी ur  च लिहितो तर त्याला काय करणार आता.. पण सध्या तरी परीक्षांमध्ये या शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट भाषेला परवानगी नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गोची होत आहे, हेच खरं! त्यामुळे आपल्या या सवयीला मुरड घालत यंगस्टर्सना पुन्हा एकदा एखादी डिक्शनरी घेऊन अभ्यास करायची वेळ आली तर नवल वाटायला नको! सो, बचके रहना रे बाबा..
 

PRASAD NADKARNI