म्हणी - "असतील शिते तर जमतील भुते"

Started by Atul Kaviraje, August 25, 2021, 11:34:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "असतील शिते तर जमतील भुते"


                                     म्हणी
                                 क्रमांक -22
                        "असतील शिते तर जमतील भुते"
                       -------------------------------


22. असतील शिते तर जमतील भुते
     ---------------------------

--एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
--संस्कृतपर्याय- द्रव्येण सर्वे वशा:।
-- फुकटात मेजवान्या (पार्ट्या) देणाऱ्या व्यक्तीजवळ त्याचे पैसे संपेपर्यंत भरपूर लोभी लोकांचा गोतावळा असतो , एकदा पैसा अडका संपला कि हे कोणीही फुकटे मदतीला येत नाहीत .
--संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात.
--एखाद्या व्यक्ती कडून फायदा होणार असला की तिच्या भोवती माणसे गोळा होतात.
--फायदा असेल तर त्या माणसाच्या आजूबाजूला फिरणे.
--एखाद्या व्यक्तीकडून फायदा होणार असेल त्याचा अवतीभवती लगेच माणसे गोळा होतात.
--If a man is going to benefit, people gather around him
--पैश्यांमुळेच  चार व्यक्ती आपल्या भोवती असतात.
--आपल्याजवळ पैसे असल्यास आपल्याभोवती खुश-मस्कऱ्यांची गर्दी जमते.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                -------------------------------------------

--स्पष्टीकरण:--
'असतील शिते तर जमतील भुते' या म्हणी मध्ये 'शिते' म्हणजे पैसा किंवा कोणत्याही प्रकारचा फायदा असा होतो.
याचाच अर्थ असा की जर आपल्याकडे पैसा असेल किंवा आपल्यामुळे कोणाचा फायदा होणार असेल तर आपोआप आपल्या सभोवती माणसे जमा होतात.
--आपला भरभराटीचा काळ असला. तर आपल्याभोवती माणसे गोळा हातात.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.08.2021-बुधवार.