म्हणी - "आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं"

Started by Atul Kaviraje, August 29, 2021, 02:34:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं"


                                      म्हणी
                                  क्रमांक -26
                      "आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं"
                     -----------------------------------


26. आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं
      -------------------------------

--स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
--एकच चूक दोन मुलांनी केली असेल तरी आपण आपल्या मुलाची चूक नाही असे मानून दुसऱ्याच्या मुलाला बोल लावतो , भरपूर नावे ठेवतो .
--आजच्या काळात ही म्हण चपखल बसते. कारण आजकाल लोकांना स्वतःच्या मुलांचं कौडकौतुक करण्यातच जास्त धन्यता वाटते. पण इतरांच्या गुणी मुलांचं कौतुक करणारे विरळाच असतात.
--स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे.
--स्वतःचे चांगले होणे आणि दुसऱ्याचे वाईट होणे अशी प्रवृत्ती असणे.
--स्वतः संबंधी जी उदार बुद्धी असते ती दुस-यांच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती.
--स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.
--स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट असा स्वभाव असणे.
--मनुष्याला स्वतःच्या आपत्यासंबंधी जे प्रेम वाटत असते तसे दुसर्‍याच्याबद्दल वाटत नाही. मनुष्य स्वतःसंबंधी जी उदारबुद्धि व प्रेम ठेवतो, ते दुसर्‍यासंबंधी ठेवीत नाही. दुसर्‍याचे आपल्या सारखेच असले तरी ते वाईट दिसते. उदाहरणार्थ, आपला स्वतःचा मुलगा असला म्हणजे त्याला बाव्या बाळ्या इत्यादि म्हणून त्याला लाडविण्यांत येते, त्याच्या दोषांकडे किंवा अपराधांकडे काणाडोळा करण्यांत येतो. परंतु दुसर्‍याचा मुलगा तसेच अपराध करणारा असेल तर त्याला भिकारडेंग, भिकारडा इत्यादि अपशब्द बोलण्यात येतात. तेव्हां ही पाहण्याची दृष्टि पक्षपाती असते.
--The tendency to be good to oneself and to be bad to another.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                 --------------------------------------------


                      उदाहरण :-----
                    -----------

     आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कारटं का, तुमचं मग काय होतं ? – धनंजय मुंडे

     रहिमतपुर ( सातारा ) – आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं कारटं का? तुमचं मग काय होतं. आमच्या गठबंधनाला ठगबंधन सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत अहो तुम्ही देशातील १२५ कोटी जनतेला ठगवलं आहे त्याचं काय? असं जोरदार प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी रहिमतपूरच्या जाहीर सभेत दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या दुसर्‍या दिवसातील पहिली सभा सातारा जिल्ह्याच्या रहिमतपूर येथे सभा पार पडली.जालनाच्या कालच्या सभेतल्या वायरल झालेल्या एका व्हिडीओत भाजपचे कार्यकर्ते झोपलेले दिसले. यांना झोपेतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच दिसत असावी. त्यांच्या अधिवेशनात फक्त राष्ट्रवादीचीच चर्चा होती. मुख्यमंत्रीही विकासाबाबत न बोलता परिवर्तनयात्रा वगैरे माहिती नाही असं म्हणाले. या रिंगणात तुम्हाला माहिती देतो असे आव्हान मुंडे यांनी दिले.

    भाजपने रहिमतपूर आणि सातारा जिल्ह्यात कितीही कमळांची चित्रे काढून भिंती रंगवल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. भाजपचे येथे भिंती रंगवणे म्हणजे काळ्या पाषाणावर डोकं फोडल्यासारखं आहे. कारण येथील जनता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाजूने उभी राहिल असा विश्वास व्यक्त केला.२ कोटी नोकर्‍या देणार म्हणून आजची ही तरुणाई 'हर हर मोदी घर घर मोदी' म्हणत उड्या मारत होती. परंतु साडेचार वर्षांत नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवलं हे लक्षात आल्यावर आज हिच तरुणाई साधी सोयरीकही जुळली नाही असे सांगत आहे.

     धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मराठ्यांना आरक्षण दिल्याचे सांगत फक्त जाहिरात केली. मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही. अरे किती फसवणार आहात जनतेला असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट केली ते भाजपवाले कुठल्या तोंडाने मत मागायला येणार आहेत अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी केली.सभेला येण्यापूर्वी रहिमतपूर शहरातून बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

     या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा समिधा जाधव, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, आदींसह रहिमतपूर, पाटण, कोरेगाव, कराड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


              (साभार आणि सौजन्य-संदर्भ -महापॉलिटिकस .कॉम)
            ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2021-रविवार.