‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "खुळा पाऊस"

Started by Atul Kaviraje, August 31, 2021, 12:50:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे एकविसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही "गिरीश (शंकर केशव कानेटकर)" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "खुळा पाऊस"


                                कविता पुष्प-एकविसावे
                                    "खुळा पाऊस"
                               ----------------------

खुळा पाऊस--

'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर यांची 'खुळा पाऊस' ही कविता.

पाऊस खुळा , किती पाऊस खुळा,
शिंपडून पाणी, आई भिजवि फुला ।।ध्रु.।।

नाचे किती वेड्यापरी
बडबडे कांहींतरी,
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ।।१।।

दीनवाणी वेलीबाई
पांघराया नाहीं कांहीं,
काय करूं, उघडा हा राहे छकुला।।२।।

उचलून आणूं काय
पुसूं डोकें, अंग, पाय,
काकडून गेला किती बघ माकुला ।।३।।

निजवूं या गादीवर
पांघरूण घालू वर,
देऊं काय, सांग आई, आणून तुला ? ।।४।।

काय – "नको तोडूं फूल
वेल - पावसाचें मूल,
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला ?।।५।।

आणि "येऊं मी घरांत?
भिजूं नको अंगणात,
नको आई, चमकेन मीही आपुला ।।६।।

मज वेडा म्हणतील
फूल शहाणें होईल,
मग वेडा म्हणतील सगळे तुला ।।७।।


                 कवी-गिरीश (शंकर केशव कानेटकर)
                ----------------------------------

                 (कवितेची चाल : झिम्मा खेळूं ये)
               ------------------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2021- मंगळवार.