गंभीर वास्तव चारोळ्या-"बा तरुणा, ओढ ? (सोड) ती सिगारेट !"

Started by Atul Kaviraje, August 31, 2021, 02:46:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

            विषय : तरुणाई जात चाललीय सिगारेटच्या आहारी
                           गंभीर वास्तव चारोळ्या
                 "बा तरुणा, ओढ ? (सोड) ती सिगारेट !"
                                (भाग-१)
          ----------------------------------------------


(१)
"बा तरुणा", तू पहात नाहीस का ?
"सिगारेट" पाकिटावरला तो वैधानिक इशारा ?
"बा तरुणा", तू पहात नाहीस का ?
पिणाऱ्यांच्या छातीचा झालेला पिंजरा ?

(२)
हरवू नकोस धुरात आपले आयुष्य
जाळू नकोस आगीत आपले सर्वस्व
चटक लागली एकदा, तर सुटत नाही,
जीवाला कायमचाच चटका देऊन जाई.

(३)
काय, गवसेल तुला या झुरक्यातून ?
फक्त दोन मिनिटांची अस्मानी  सफर
आणि त्यानंतर खोकत अन उबाळत,
घालवायची का सारी अशीच उमर ?

(४)
दुसऱ्यांचे का तू अनुकरण करणार ?
का आपले स्टेटस दाखवत फिरणार ?
जळणाऱ्या "सिगारेटचे" लाल-भडक टोक,
वेड्या, तुझेच जीवन जाळत जाणार !

(५)
हातात "सिगारेट" घेऊन तू आडवी
ऐटीत का झुकत उभा रहाणार ?
आणि येणाऱ्या जाणाऱ्या नवं-युवतींवर, 
आपल्या अदेने छाप का पाडणार ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2021-मंगळवार.