"गौळणी-राधा-कृष्ण प्रेम-खोड्या व इतर चारोळ्या" - चारोळी-पुष्प-२

Started by Atul Kaviraje, August 31, 2021, 04:30:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      "गौळणी-राधा-कृष्ण प्रेम-खोड्या व इतर चारोळ्या"
                      -------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "गौळणी-राधा-कृष्ण प्रेम-खोड्या व इतर चारोळ्या",या विषया अंतर्गत चारोळी-पुष्प-२.

    मित्रानो, पहिल्या चारोळीलाच अनुसरून अशी ही, दुसरी चारोळी आहे. गौळणींची खोडी करून , त्यांना मनसोक्त त्रास देऊन कान्हानें कुठेतरी दडी मारली आहे. गौंळणींनी कान्हाची  यशोदामातेकडे तशी तक्रारही केली आहे. पण जेव्हा त्यांचा राग शांत झाला, तेव्हा त्यांना कळून चुकलंय, जरी कान्हानें आपली खोड काढली, आपल्याला त्रास दिला, तरी तो एक लहानगा आहे, आणि लहान मुले ही खोडकर, खेळकर असतातच.

     अशी मनाची समजूत काढून, त्या जेव्हा कान्हाला शोधण्यास इकडे तिकडे भटकतात, पण कान्हा त्यांना कुठे दिसत नाही, मोहन कुठे सापडत नाही, म्हणून त्या कासावीस झाल्या आहेत. गौळणींच्या जीवाची कान्हावाचून घालमेल होत आहे. इतक्या त्या कान्हाशी समरस झाल्या आहेत.

     साऱ्या गौळणी, कान्हाला आर्ततेने पुकारीत आहेत, की कान्हा आता बस झाली तुझी मस्करी, आमचा तुझ्यावरील राग तर केव्हाच शांत झाला आहे, आता तू ही, बाहेर पड, आणि आम्हाला तुझे ते गोजिरवाणे रूप पाहू दे, तुझ्यावाचून आज आम्हा कसे सुने , उदास वाटू लागले आहे. आता झणी समोर ये, आणि तुझ्या दर्शनाने आमच्या डोळ्यांचे पारणे फेड. ऐकुया तर, या गौळणींची कान्हा दिसण्यासाठीची आर्त आळवणी-


                                   चारोळी-पुष्प-२
                                 ----------------


(२)
आज "कृष्ण" कसा दिसेना ?
आज "मोहन" कुठे सापडेना ?
त्याच्यावाचून सुने बाई वाटे,
"कान्हा" झणी समोर ये-ना !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2021-मंगळवार.