"१ सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 01, 2021, 02:36:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-01.09.२०२१, बुधवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "१ सप्टेंबर – दिनविशेष"
                                    ---------------------


अ) १ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    --------------------------

१९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

१९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.

१९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.

१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.

१९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.

१९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

१९९१: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
=========================================

ब) १ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   -------------------------

१९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जन्म.( मृत्यू : ४ ऑगस्ट २०२०)

१७९५: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२)

१८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)

१८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

१८९६: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

१९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

१९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.

१९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.

१९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

१९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

१९४५: कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) चे आध्यात्मिक नेते भक्ती चारू स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै २०२०)

१९४६: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

१९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.

१९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.
=========================================

क) १ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    ------------------------

१५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

१७१५: फ्रान्सचा राजा  लुई (१४वा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)

१८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

२००८: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

२०१४: स्पॅनडेक्स चे   निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९३०)
========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2021-बुधवार.