म्हणी - "अचाट खाणे मसणात जाणे "

Started by Atul Kaviraje, September 03, 2021, 11:34:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "अचाट खाणे मसणात जाणे "


                                          म्हणी
                                      क्रमांक -31
                             "अचाट खाणे मसणात जाणे "
                           ----------------------------


31. अचाट खाणे मसणात जाणे
    -------------------------

--खाण्यापिण्यात अतिरेक  झाल्यास परिणाम वाईट होतो.
--अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो.
--अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते.
--खाणे-पिणे हे शरीरपोषणासाठी असते याचे भान न ठेवता अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात.
--खाण्यापिण्यात अतिरेक घातक ठरतो.
--"वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर आपल्याच तब्येतीवर वाईट परिणाम होतो."
--खुप खाणे नाशवंताचे लक्षण असते.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   ------------------------------------------

1) --म्हण - अचाट खाणे मसणात जाणे  .
     उदाहरण - रात्रीची वेळ  होती  .घरी पाहुणे आले .आणि घरात रात्रीचा स्वयंपाक आईने चमचमीत आणि मसालेदार आधीच जेवणाची वेळ टळून गेलेली. आत्यांना आग्रह करता -करता आईने जेवण थोडे जास्त केले आणि काय  धावा धाव आणि पळापळी सुरू झाली. म्हणतात ना. , अचाट खाणे मसणात जाणे.

संकलक- श्रीमती कल्पना झाल्टे धुळे.
जि.प.शाळा दिवाणमळा धुळे.
=====================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
2) *अचाट खाणे मसणात जाणे *-उदाहरण - उमेश लग्नाला गेला तिथे छान पोटभर जेवण करून आला .आईनी जेवायला बोलावले तर नाही म्हणाला .आईबाबा जेवायला बसले .त्यांचे पात्रात त्याला पाटोडीची चमचमीत भाजी  दिसली  ते पाहुन  तो आईला  बोलला की मलाही जेवायचं व तो जेवला व झोपी गेला .रात्री  त्याची तबेत खूपच बिघडली त्याला ॲडमिट केले *आचाट खाणे मसणात जाणे अशी गत झाली*

संकलक - *कांचन चिपाटे*
*✍🏻नागपुर*
======================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
3) अचाट खाणे  मसणात जाणे = उदाहरण - शामराव काकाला शुगरचा त्रास होता . तरीही त्यांनी खूप आंबे खाल्ले . मग काय शुगर वाढून चकरा सुरू झाल्या .इन्सुलीनची इंजक्शन चालू झाले . शरीरभर छीद्रच छीद्र . यालाच म्हणतात अचाट खाणे मसणात जाणे ! !

संकलक =आयुष नरवाडे , हिंगोली
======================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
4) *अचाट खाणे मसणात जाणे*
उदाहरण -  गण्याच्या घरची शेळी , नजर चुकवून मक्याच्या गुडात घुसली. मनसोक्त चरली, वरून पाणी पण प्याली.शेवटी जे नाही व्हायचं तेच अचाट खाणे आणि मसनात जाणे. झाल. पोट फुगून तडफडून मेली.डाँक्टर जाता जाता पुटपुटला

संकलक- विशाल टिप्रमवार , औरंगाबाद
======================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
5) अचाट खाणे मसणात जाणे .उदाहरण - गावचा गाव भंडाऱ्याच्या जेवणामध्ये राहूल गोड भरपूर खा ल्ला ते त्याला पचले नाही संध्याकाळी त्याला उलट्या होऊ लागल्या दवाखाण्यात जावे लागले सलाईनलाऊन विला ज करावे लागले . भान न ठेवता अतिरेक केल्याने त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागते .

संकलक - श्री शिंदे भास्कर तात्याराव
स . शि . प्रा शाळा उमर दराता शिरुर अ . जि लातूर
=====================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
6) म्हण _ अचाट खाणे मसणात जाणे.
उदाहरण-   सुनंदाने पाणीपुरीच्या गाड्यावर पाणीपुरी आवडली म्हणून
विचार न करता भरपूर पाणीपुरी खाल्ली दुसर्या दिवशी तिला अपचन झाल्यामुळे दवाखान्यात जावे लागणे.
सुनंदाच्या या वागण्यालाच म्हणतात
अती खाणे मसणात जाणे.

    संकलक   -   नयना देवकते.उस्मानाबाद.
======================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
7) म्हण— *अचाट खाणे मसणात जाणे* 
—उदाहरण - बाबांनी आणलेली जिलेबी राजुने खाल्ली. आवडता पदार्थ म्हणून जास्तच खाल्ली. मग काय दुसर्‍या दिवशी पोट दुखू लागले. अपचन झाले. राजूला जास्तच त्रास झाला.दवाखान्यात जावे लागले. यालाच म्हणतात *"अती खाणे मसणात जाणे"*

संकलक -*संध्याराणी ज. कोल्हे*
ता.कळंब जि.उस्मानाबाद
=====================================
💎➖〰〰➖〰〰➖〰〰💎
8) उदाहरण - एकदा गणपती कार्यक्रमात लाडू खाण्याची शरयत लागली रामरावांनी भाग घेतला एक दोन पाच दहा अस करत 20 लाडू खाल्ले आणी गडबडा लोळू लागले त्यांना ताबडतोब दवाखानयात नेले बायको वैतागून म्हणते कशी बाई बाई काय म्हणावे अचाट खाणे आणि म्हसणात जाणे

संकलक - सौ. निर्मला विजय पाटील जि प शाळा कारसुळ निफाड नासिक
=======================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2021-शुक्रवार.