"३ सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 03, 2021, 11:38:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-0३.09.२०२१, शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "३ सप्टेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) ३ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    ---------------------------

३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.

१७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

१९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.

१९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.

१९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.
=========================================

ब) 3 सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   -------------------------

१८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९०५)

१८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)

१८७५: पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या यांचा जन्म. (मृत्यू: ३० जानेवारी १९५१)

१९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा जन्म.

१९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ४ मे २००८)

१९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी २०१२)

१९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म.

१९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९८०)

१९३१: नाटककार श्याम फडके यांचा जन्म.

१९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी यांचा जन्म.

१९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म.

१९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २०१२)

१९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन यांचा जन्म.

१९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई यांचा जन्म.

१९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी यांचा जन्म.

१९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा जन्म.
=========================================

क) ३ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
----------------------------

१६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल यांचे निधन.

१९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस यांचे निधन.

१९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर यांचे निधन.

१९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८९२)

१९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८९०)

१९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे निधन.

२०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचे निधन.

२०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३०)
========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2021-शुक्रवार.