म्हणी - "आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना"

Started by Atul Kaviraje, September 04, 2021, 11:30:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना"


                                          म्हणी
                                      क्रमांक -32
                        "आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना"
                        ------------------------------------


32. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
      ----------------------------------

--दोन्ही बाजूंनी अडचण.
--- एखाद्या कठीण प्रसंगात सर्व बाजूने मनुष्य अडचणीत सापडला तर कोणत्याच बाजूने मार्ग निघू शकत नाही .शब्दशः अर्थ घेताना घरात आई जेवण करून वाढू शकत नसेल आणि वडील बिक मागून अन्न हि मागण्यास मज्जाव करत असतील तर लेकरू पोटातील भूक घेऊन कुठे जाईल ?
--दोन्हीकडून संकटात सापडणे.
--दोन्हीकडून अडचणीत आलेल्या माणसांची केविलवाणी स्थिती होणे.
--Difficulty on both sides.
--दोन्ही कडून अडचण.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
               ----------------------------------------------

--मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार :--

घरांत आईनें जेवावयास घातले नाही म्हणून मुलाने बाहेर भीक मागून खावयाचे मनांत आणले तर त्या गोष्टीस बापाची मनाई. याप्रमाणें दोहोंकडून अडचणीत सापडलेल्या मुलाची स्थिति मोठी केविलवाणी होते. कोणी दोन अडचणीत सापडला असतां म्हणतात. तु०-इकडे आड तिकडे विहीर.
=========================================

--मुंबई : उदाहरण :--

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, प्रवासी कामगार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत अडकले आहेत. आता मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी श्रमिक ट्रेनची सोय करण्यात येत आहे. मात्र, श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून सध्या ट्विटरवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या भांडणात जनतेची स्थिती म्हणजे 'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना' अशी झाली असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
=========================================

--मुंबई : उदाहरण :--

      "आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी ठाकरे सरकारला वागणूक," अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल:---

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी करोनासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि धोरणांवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दिली जाणारी मदत रोखण्यात आली असल्याचं अमोल कोल्हे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. लोकसभेत करोना प्रादुर्भावासंबंधी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
"करोनाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. एकूण २२ टक्के केसेस आणि ३७ टक्के मृत्यु महाराष्ट्रात होत आहेत. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाराषट्र करोनाशी लढा देत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही परिस्थिती आणखी खराब होऊ शकते, हा धोका लक्षात घेता केंद्रानं महाराष्ट्राकडे अधिक लक्ष द्यायला हवं. मात्र त्याउलट १ सप्टेंबरपासून केंद्र सरकारने महाराष्ट्राची व्हेंटिलेटर्स, पीपीई किट, टेस्टिंग किट, एन ९५ मास्क आदींची मदत पुर्णपणे थांबविली आहे. 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत आहे," असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2021-शनिवार.