म्हणी - "आलीया भोगाशी असावे सादर"

Started by Atul Kaviraje, September 05, 2021, 11:32:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "आलीया भोगाशी असावे सादर"


                                      म्हणी
                                  क्रमांक -33
                         "आलीया भोगाशी असावे सादर"
                        -------------------------------


33. आलीया भोगाशी असावे सादर
      ---------------------------

--कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
--संस्कृतपर्यायः - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।
--आपल्या नशिबात् जे भोग ,त्रास आहे तो न कटकट करता सहन करायचा .
--आपल्यावर जो प्रसंग येईल त्याला तोंड द्यायला आपण तयार असलं पाहिजे.
--आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.
--अर्थ: कुरकुर न करता पदरी आलेली परिस्थिती भोगावी.
--जे नशिबात असेल, ते भोगायला तयार असावे.
--तक्रार न करता आलेली परिस्थिती स्वीकारणे.
--तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
--काहीही कटकट न करता असलेली परिस्थिती स्वीकारणे.
--नशिबात आले ते  स्वीकारणे.
--मनुष्याच्या नशीबाने जे जे त्याच्या वाट्यास येते ते ते भोगण्यास त्याने तयार असले पाहिजे. ते काही कधी चुकत नाही.
--You have to face the situation without complaining.

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
               --------------------------------------------

            संत तुकाराम अभंग वाणी:-----
          -------------------------

आलिया भोगासी असावे सादर | देवावरी भर घालूनिया ||१|
तोची कृपासिंधू निवारी साकडे | येर ते बापुडे काय रंक ||२||
भवाचिये पोटी दु:खाचिया राशी | शरण देवासी जाता भले ||३||
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता | चिंतावा तो आता विश्वंभर ||४||

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फेसबुक .कॉम)
          ------------------------------------------

                        संदर्भ स्पष्टीकरण:-----
                      ------------------

     तुकारामांच्या ज्या रचनांना म्हणींचे रूप प्राप्त झाले आहे त्या पैकी ह्या अभंगाचा पहिला चरण आहे . अशी अनेक उदाहरणे दाखवता येतिल.

     सर्व सामान्य माणसे दुखः आणि पीडा यांनी त्रस्त झाली की  हा चरण म्हणतात . एक असहायता प्रगट करण्याची ही जणू रीतच झाली  आहे . प्रत्यक्षात तुकाराम  महाराज निराश न होण्यासाठी उपाय सांगत आहेत देवावर भार घातला की आपली सहनशक्ती वाढते . देवाशिवाय  अन्य कोणी दुखः निवारण करायला समर्थ नाही . देव  परिस्थिति तरी बदलेल किंवा आहे ती परिस्थिति स्वीकारायचे सामर्थ्य देईल . देवाला शरण गेल्यावर तो कृपा करणारच कारण तो कृपासिंधु आहे. इतर तेवढे शक्तिमान नाहीत म्हणून  बापुडे .  मुळात दुखः भयापोटी निर्माण होते. भय काहीतरी गमावण्याच्या शक्यतेमुळे निर्माण होते. मग ते धन असो मान असो व जीवित.  हे काहीही  आपले नसताना आपण ते आपले मानतो आणि गमावण्याची भीती बाळगतो . " सर्व काही देवाचे " हा भाव धरिला की देवाचे होते ते देवापाशी गेल्याची भीती कशाला ? भीती नाही तिथे दुखः नाही . तुकाराम महाराज म्हणतात की व्यर्थ काही न करता विश्वंभराचे  चिंतन करावे . " विश्वंभरे  विश्व सामावले पोटी  , तेथेच शेवटी आम्ही असु  " असे दुसरीकडे महाराजांनी सांगितले आहे . जगाचे कल्याण करतो तो आपलेही करणारच . आपण स्वतःच स्वतःचे कल्याण  काय हे ठरवायचे कशाला ? तो भार ज्याचा आहे त्याच्यावर ठेवावा म्हणजे  आपण मुक्त होऊन जाऊ .

                 (साभार आणि सौजन्य -अरविंद एम  खरे .ब्लॉगस्पॉट .कॉम)
               ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.09.2021-रविवार.