II पिठोरी (दर्श) अमावस्या II-लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 04:21:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II पिठोरी (दर्श) अमावस्या II
                                        लेख क्रमांक-4
                              ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-सोमवार म्हणजे, ०६.०९.२०२१, चा दिवस दोन महत्त्वाचे  विशेष असे पर्व, सण घेऊन आला आहे, ते म्हणजे, पिठोरी अमावस्या, आणि बैल पोळा. या, चला जाणून घेऊया, या दोन दिवसांचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत कथा, कविता आणि बरंच काही.

     पिठोरी अमावस्या मातृदिन असेही म्हणतात.
मराठी मातृदिनाच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात.

    व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पुरणपोळी व खि‍रीची वाटी डोक्यावर घेऊन "अतिथी अतिथी कोण ?" असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे, "सर्व अतिथ मीच." आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना खिर व पुरणाचे पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला "पिठोरी अमावस्या' असे नाव पडले असणार. स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.


                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-गुरुजीपूने .कॉम)
                         -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.