II“बैल पोळा”II-बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, September 06, 2021, 04:24:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II"बैल पोळा"II
                           बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा               
                         -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-सोमवार म्हणजे, ०६.०९.२०२१, चा दिवस दोन महत्त्वाचे   विशेष असे पर्व, सण घेऊन आला आहे, ते म्हणजे, पिठोरी अमावस्या, आणि बैल पोळा. या, चला जाणून घेऊया, या दोन दिवसांचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत कथा, कविता आणि बरंच काही.

                          बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा-----

एकमेकांना शुभेच्छा दिल्यामुळे प्रत्येक दिवस हा चांगला होता. इतरवेळी तुम्ही शेतकरी स्टेटस पाहिले असतील. पण या खास दिवशीही तुम्ही शुभेच्छा संदेश पाठवून बैल पोळा हा दिवस साजरा करायला हवा.

आज बैलाले खुराक,
रांधा पुरणाच्या पोळ्या,
खाऊ द्या रे पोटभरी,
होऊ द्या रे मगदुल
     बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिंगे घासली, बाशिंगे लावली,
माढुळी बांधली,म्होरकी आवरली,
तोडे चढविले, कासारा ओढला,
घुगुंरमाळा वाजे खळाखळा,
आज सण आहे बैल पोळा,
     बैलपोळाच्या शुभेच्छा!

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचे देणे,
बैला, तुझा खरा सण,
शेतकऱ्या तुझा रीन,
     बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला,
आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
     बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

आला बेंदूर शेंदूर,
सण वर्षाचा घेऊन,
खादेमळणी झाल्यावर,
लागली चाहूल,
सर्जा-राजा गेले आनंदून,
     शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं...,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
     शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!

गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
     बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
     बैल पोळाच्या शुभेच्छा !

डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
येगं रामाच्या बाणाचा,
तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
     बैल पोळाच्या शुभेच्छा!

आज आला सण बैलाचा,
त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
     बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम) 
                     -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2021-सोमवार.